डोंबिवली पत्रकार संघ आणि कॉंग्रेस च्या वतीने शास्त्रीनगर रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सन्मान
डोंबिवली, शंकर जाधव : कोरोना काळात नागरिकांचे जीव वाचविणारे आणि अविरत सेवेचे मानकरी असलेले डॉक्टर्स, परिचारिका,वॉड बॉय,सफाई कर्मचारी,समाजसेवक कोरोना योद्धांना डोंबिवली पत्रकार संघ-२०२० आणि कॉंग्रेसच्या वतीने सन्मानपत्र वाटप करण्यात आले.डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात सदर कार्यक्रम पार पडला.आपल्या कामाचा हा सन्मान म्हणजे केलेल्या कामाची पोचपावतीच असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.
यावेळी डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव,उपाध्यक्ष सुरेश गायकवाड,सचिव नरेंद्र थोरावडे, सदस्य प्रशांत जोशी, बापू वैद्य, कॉंग्रेस बी ब्लॉक कमिटी डोंबिवली पूर्व विभाग अध्यक्ष नवेंदू पाठारे,जनरल सेक्रेटरी अशोक कापडणे,एकनाथ म्हात्रे,पमेश म्हात्रे,हर्षद पुरोहित,विजय जाधव,वर्षा गुजर,वर्षा शिखरे,अभय तावडे,शीला भोसले,अशोक कांबळे,अजय पौळकर आदींनी शास्त्रीनगर रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सन्मान पत्र दिले.मानवतेची जपवणूक करणारे शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी गेली ९ महिने आपली अविरत सेवा दिली आहे.डॉक्टर हेच देव असे मानत संपूर्ण जग त्यांच्याकडे आशेने पाहत आहे.
दिवसरात्र कोरीना बाधित रुग्णांची सेवा करून त्यांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढून नवीन जीवन देणाऱ्या डॉक्टरस आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे सर्व जग आभार मनात आहे. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी यांनी केलेल्या कामाचा सन्मान होणे आवश्यक होते. म्हणून आज या ठिकाणी त्यांन सन्मानपत्र ददेऊन गौरविण्यात आले आहे असे डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी सांगितले.
तर कोरोना योद्धांना सन्मानपत्र देऊन कॉंग्रेस आणि पत्रकार संघाने त्यांचा केलेला गौरव हे त्यांच्या कामाचे कौतुकचा आहे असे कॉंग्रेस पदाधिकारी अशोक कापडणे यांनी सांगितले.यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर,डॉ.संजय जाधव, डॉ.आधर्डे, डॉ.हेमराज देवरे, मुख्य परिचारिका मंगला सोनावणे, समाजसेवक विश्वनाथ शेनोय,जितेंद्र अमोणकर,भगवतीप्रसाद रुंगठा,सुरक्षा रक्षक कैलास पवार, कर्मचारी राम देढे,सफाई कर्मचारी पीरा स्वामी आदींसह डॉक्टर्स,परिचारिका, सफाई कर्मचारी यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देण्यात आले.

Post a Comment