Header AD

कचोरे प्रभागात साकारणार ३५ हजार स्क्वेयर फुट जागेवर भव्य उद्यान


■आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्व अशोक सिंघल उद्यानाचे भूमिपूजन....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व कचोरे प्रभागात भाजप महिला जिल्हाध्यक्ष व नगरसेविका रेखा चौधरी यांच्याप्रयत्नाने आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष स्व अशोक सिंघल यांच्या नावाने उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचे भूमीपुजन भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

कचोरे प्रभागातील हे पहिलेच उद्यान असुन नागरिकांची उद्यानाची प्रतीक्षा काही महिन्यातच संपणार आहे. सुमारे ३५ हजार स्क्वेयर फुट जागेवर हे उद्यान उभारण्यात येणार असून या उद्यानात मिया वॉकी जातीची झाडं  लावण्यात येणार असल्याने या परिसरातील ट्रेनचा कर्कश आवाज रोखण्यासाठी या झाडांची मदत होणार आहे. कल्याण डोंबिवलीत प्रथमच एखाद्या उद्यानात अशा प्रकारची झाडं लावण्यात येत असून आंतर राष्ट्रीय दर्जाचं उद्यान उभारण्यात येत आहे. तर स्व अशोक सिंघल यांच्या नावाने राज्यात हे पहिले उद्यान असल्याची माहिती नगरसेविका रेखा चौधरी यांनी उदघाटन प्रसंगी दिली.

भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी या कामाबद्दल चौधरी यांचे कौतुक करत त्यांच्या हातून लोकसेवेची कामे घडत राहोत अशा शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेबजरंग दलाचे जिल्हा संयोजक अर्जुन बापट, जिल्हा सहसंयोजक राजन चौधरी यांच्यासह भाजप पदाधिकरी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

कचोरे प्रभागात साकारणार ३५ हजार स्क्वेयर फुट जागेवर भव्य उद्यान कचोरे प्रभागात साकारणार ३५ हजार स्क्वेयर फुट जागेवर भव्य उद्यान Reviewed by News1 Marathi on November 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads