Header AD

भिवंडीत तलवार बाजचा दुसरा कारनामा, महिला वनाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून ठेवले डांबून

भिवंडी , प्रतिनिधी  :  तालुक्यातील राहुर या गावात चार दिवसांपूर्वी यासिन चिखलेकर आणि त्याच्या भावानं नंग्या तलवारी घेऊन तिघांवर वार केले होते. ही घटना ताजी असतानाच या तलवारबाजांनी महिला वनअधिकारीला धक्काबुक्की करत फार्महाऊसमध्ये डांबल्याची माहिती समोर आली आहे.महिला वनअधिकारीसह काही कर्मचाऱ्यांनी यासिन चिखलेकर याच्या फार्म हाऊसवर छापा टाकला. दोन ट्रक खैर जप्त केले. मात्र, यासिन चिखलेकर यांनी आपले साथीदार आणि कुटुंबीयांच्या 13 मदतीनं महिला अधिकाऱ्यांसह वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ करत फार्म हाऊसमध्ये डांबून ठेवलं. फार्म हाऊसच्या गेटला कुलूप लावून त्यांच्यावर कुटुंबातील महिलांना पाळत ठेवण्यास सांगितलं.


वेळीच पडघा पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन महिला अधिकारीसह वन कर्मचाऱ्यांची सूटका केली. पोलिसांनी कुलूप तोडून वन अधिकाऱ्यांची सुटका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात यासिन चिखलेकर याच्या 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र  सर्वजण फरार झाले आहेत. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. यासिन याच्यावर खैर, साग, चंदनाची तस्करी करत असल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर पोलिस, वन अधिकारी आणि नागरिकांना मारहाण असे त्याच्याविरोधात 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. यासिन याची या परिसरात मोठी दहशत असल्याचं समजते. त्यामुळे त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महिला अधिकारीसह वन कर्मचाऱ्यांना यासिन चिखलेकर यांनं आपल्या फार्म हाऊसवर डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. तातडीनं पोलिस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी याचिनच्या कुटुंबीयांना समज दिली. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी गेटचं कुलूप तोडून महिला वन अधिकारीसह कर्मचाऱ्यांची सुटका केली.पोलिसांनी आरोपींच्या घरी जाऊन त्यांचा शोध घेतला. पण ते आढळून आले नाही, सर्व आरोपी गुजरातला फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांची पथके तयार करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक करू, असं पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी सांगितलं आहे.


नंग्या तलवारी हातात घेऊन केला पाठलाग...


दरम्यान , भिवंडी तालुक्यातील राहूर या गावात यासिन चिखलेकरसह त्याच्या भावानं गेल्या आठवड्यात खुलेआम नंग्या तलवारी हाता घेऊन तिघांचा पाठलाग केला होता. त्यांच्यावर वार केले होते. यात वडिलांसह दोन मुले जखमी झाले होते.या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात तलवारबाज यासिन चिखलेकर, हजर चिखलेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं होतं.परिसरात पुन्हा दहशत पसरली असून या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये मोठा भाऊ भाजपचा कार्यकर्ता असून खैर, चंदन सप्लाय करण्याचा व्यवसाय असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे आता ठाणे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहे.

भिवंडीत तलवार बाजचा दुसरा कारनामा, महिला वनाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून ठेवले डांबून भिवंडीत तलवार बाजचा दुसरा कारनामा, महिला वनाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून ठेवले डांबून Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads