Header AD

ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या गर्डर चे काम तात्काळ पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करावा खासदार राजन विचारे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
ठाणे ,  प्रतिनिधी  :  हायवे पूर्वद्रुतगती महामहामार्गावरील कोपरी रेल्वे पुल बोटल लेक अरुंद असल्याने या ठिकाणी मुंबई कडे ये-जा करताना तसेच नाशिक अहमदाबादला जाणाऱ्यांसाठी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना होत असल्याने सुरू असलेल्या कोपरी रेल्वे पुलाच्या कामाची पाहणी खासदार राजन विचारे व महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के, यांनी रेल्वे व एम. एम. आर. डी. ए. तसेच वाहतूक शाखेचे पोलिस उप आयुक्त, महापालिका, महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाचे अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा आयोजित केला होता. 


या पाहणी दौऱ्याला मध्यरेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता डी. डी. लोलगे, एम. एम. आर. डी. ए. चे अभियंता सुर्वे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, कोपरी नौपाडा विभागाचे शिवसेना पदाधिकारी रमाकांत पाटील, किरण नाकती व इतर शिवसैनिक उपस्थित होते.


इसवी सन 1965 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावेळी च्या जनगणनेनुसार रेल्वे कोपरी पुलाचे बांधकाम केले होते. त्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना हा पूल धोकादायक झाल्याचे कळतात त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या पुलाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळवली.


तसेच रेल्वे महाव्यवस्थापकांकडे वारंवार बैठका घेऊन यासाठी नकाशांची मंजुरी एम. एम. आर. डी. ए. यांच्या अधिकाऱ्यांना मिळवून दिली. त्याबरोबर नौपाडा भास्कर कॉलनी येथील चिखलवाडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पंधरा ते वीस फूट पाण्याची पातळी तयार होऊन नागरिकांचे नुकसान होत होते. यासाठी या ठिकाणी नाल्याची निर्मिती व नव्याने होणाऱ्या रेल्वेस्थानकाला ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गाची ची निर्मीती या अति अवश्यक कामांचा समावेश खासदार राजन विचारे यांनी यात प्रकल्पामध्ये हे करून घेतला.


दि. 24 एप्रिल 2018 रोजी सुरू झालेल्या कोपरी पुलाच्या बांधकाम मे 2021 पर्यंत पूर्ण होण्याच्या अपेक्षित असताना कोरोनाच्या महामारीच्या काळात मजुरांचा अपुरा तुटवडामुळे या अवस्थेत बंद पडलेले काम सुरू करण्यास मंजुरी मिळवली होती. या आजच्या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी 65 मीटर लांबीच्या 14 गर्डर पैकी फेज 1 च्या 7 गर्डर चे काम डिसेंबर शेवटपर्यंत टाकून घेण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.


त्यावरील कॉंक्रिटीकरणाचे (स्लॅपचे) काम जानेवारीच्या अंतिम आठवड्यात पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करावा. व दुसऱ्या टप्प्यातील फेज 1ए च्या पुढील गर्डर चे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या गर्डर चे काम तात्काळ पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करावा खासदार राजन विचारे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या गर्डर चे काम तात्काळ पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करावा खासदार राजन विचारे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना Reviewed by News1 Marathi on November 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads