मासुंदा तलावाच्या भोवती सर्व कामगार संघटना व सामाजिक संघटनाच्या जन आंदोलन संघर्ष समिती तर्फे मानवी साखळी ( श्रमिक साखळी) उभारण्यात आली होती
ठाणे ,प्रतिनिधी : संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2020 रोजी ठाणे येथील मासुंदा तलावाच्या भोवती सर्व कामगार संघटना व सामाजिक संघटनाच्या जन आंदोलनसंघर्ष समिती तर्फे मानवी साखळी ( श्रमिक साखळी) उभारण्यात आली होती. या श्रमिक साखळी मध्ये जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, हिंद मजदूर सभा, आयटक, इंटक, घरेलू कामगार संघटना, राज्य कर्मचारी संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, जनरल कामगार संघटना,अन्न अधिकार अभियान, स्वराज अभियान, म्युनिसिपल लेबर युनियन, म्युज फाऊंडेशन, व्यसनमुक्ती अभियान आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार - कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
* शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा.
* कामगार संहिता 2020 त्वरित मागे घ्या.
* कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करा.
* नियमित कंत्राटी कामगारांना कायम करा.
* वीज बिल 2020 रद्द करा.
* नवीन शैक्षणिक धोरण 2020 रद्द करा
* नवीन कामगार संहिता रद्द करा.
* आयकर लागू नसलेल्या कुटुंबाला लाॅकडाऊन काळासाठी दर माह रू.7,500 निर्वाह भत्ता अदा करा.
* सर्व असुरक्षित व असंगठित मजुरांना पीएफ, विमा, मासिक पेंशन लागू करा.
* सर्व कामगारांना जुनी पेंशन योजना लागू करा.
* सार्वजनिक रेशन व्यवस्था बळकट करा. सर्व जीवनावश्यक वस्तू रेशन कार्ड वर सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्या.
* केंद्र सरकारच्या जन विरोधी धोरण हाणून पाडण्यासाठी संघटित व्हा.
* केंद्र सरकारच्या अघोषित आणिबाणीला विरोध करा.
* लडेंगे तो ही जितेंगे. हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है .
या व इतर मागण्यांचे बाबतीत यावेळी घोषणा देण्यात आल्या येत होत्या.
आंदोलनात कामगार नेते एम ए पाटील,जगदीश खैरालिया,संजय मंगला गोपाळ,सचिन शिंदे,भास्कर गव्हाळे,डाॅ.संदिप वंजारी,लिलेश्वर बन्सोड़,निर्मला पवार,मुक्ता श्रीवास्तव,जगदीश उपाध्याय,बिरपाल भाल,धोंडिबा खराटे आदिंसह विविध संघटनांचे नेते,कार्यकर्ते ठाणे मासुंदा तलावाच्या भोवती मानवी साखळी / श्रमिक साखळी करतांना सर्वानी दोन दोन मीटर अंतरावर उभे राहून मास्क व सुरक्षेची काळजी घेत लोकं आंदोलनात मोठ्या संख्येने अवश्य सहभागी झाले होते.
शेवटी कामगार संघटना कृती समिती व जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने एम.ए. पाटील, जगदीश खैरालिया, भास्कर गव्हाळे, सचिन शिंदे, डाॅ संदीप वंजारी आणि मंजु वर्मा यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले.

Post a Comment