Header AD

पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी १४ तासांचा मेगाब्लॉक

    कल्याण ,कुणाल म्हात्रे  :  कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १४ तासांच्या मेगाब्लॉकला मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वे व्यवस्थापकांच्या दालनात झालेल्या बैठकीत या मेगाब्लॉकला मंजुरी देण्यात आली. पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचा गर्डर लाँचिंगचा महत्वाचा टप्पा शिल्लक आहे.


या पुलाचा गर्डर बांधून तयार असून तो लाँच करण्यासाठी मेग ब्लॉकची मागणी तो बांधणाऱ्या कंपनीने रेल्वेकडे केली होती. त्यानूसार आज कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापकां समवेत बैठक आयोजित केली होती. त्याला मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल, महाव्यवस्थापक संजीव मित्तल, एमएसआरडीसी अधिकारी सोनटक्के आणि पत्रीपुल बांधत असणाऱ्या राईट्स संसंस्थेच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
त्यानूसार पत्रीपुलाच्या गर्डर लाँच करण्यासाठी २१ आणि २२ नोव्हेंबरला दिवसाच्या वेळी प्रत्येकी ४ तासांचे (एकूण ८ तास) दोन तर २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी ३ तासांचे दोन (एकूण ६ तास) मेगाब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून मंजुर करण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. दरम्यान मेगाब्लॉकच्या काळात बऱ्याच लोकल, मेल, एक्स्प्रेस रेल्वे रद्द कराव्या लागणार असल्याने उद्भवणाऱ्या वाहतुक समस्येबाबतही उपाय योजना निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच गर्डर लाँचिंगचे काम सुरक्षितपणे करण्यासह कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी रेल्वे रिझर्व फोर्स तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाकडून पुरेशी सुरक्षायंत्रणा उभी करण्यात येणार आहे.


तर नागरिकांची वाहतुकीची गैरसोय होऊ नये याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत अतिरिक्त बस सेवा सुरु करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. याशिवाय कल्याण शिळ रस्त्यावरील काटई रेल्वे उड्डाणपुलाचे नकाशे बऱ्याच कालावधीपासून मंजुरीसाठी प्रलंबित होते. ते नकाशेही येत्या आठवड्यात मंजूर करण्यात येतील अशी माहिती रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली.

पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी १४ तासांचा मेगाब्लॉक पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी १४ तासांचा मेगाब्लॉक Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads