Header AD

राजेंद्र जाधव यांची रिपब्लिकन पक्षाच्या आशिया खंडाच्या निमंत्रक पदी निवड केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले




मुंबई , प्रतिनिधी  :  रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध धम्म प्रसारक असणारे आयु. राजेंद्र शांताराम जाधव यांची आशिया खंडातील  राष्ट्रांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आणि बौद्ध धम्म विचार प्रसाराचे कार्य करण्यासाठी रिपाइं चे आशिया खंडाचे निमंत्रक ( समन्वयक) पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज केली. 


राजेंद्र जाधव हे अनेक वर्षे डॉ. द्वारकानाथ कोटणीस रिसर्च ब्युरोच्या माध्यमातून भारत चीन मैत्री संबंधाबाबत उपक्रम आयोजित करतात. कोटणीसांच्या चित्रप्रदर्शनातून शांतीचा संदेश देत असतात. चीन, सिंगापूर, मंगोलिया, नेपाळ, श्रीलंका आदी राष्ट्रांमध्ये राजेंद्र जाधव यांनी बौद्ध धम्माचा शांती संदेश देणारे विविध कार्यक्रम आयोजित करून यशस्वी केले. 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघटित होण्याचा संदेश त्यांनी आपले ध्येय मानून आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध धम्माचा शांती संदेश देतानाच आपल्या कौशल्याने अनेक लोकांना मार्गदर्शन करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आशिया खंडात बौद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आशिया खंडाचे समन्वयक म्हणून राजेंद्र जाधव यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

राजेंद्र जाधव यांची रिपब्लिकन पक्षाच्या आशिया खंडाच्या निमंत्रक पदी निवड केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राजेंद्र जाधव यांची रिपब्लिकन पक्षाच्या आशिया खंडाच्या  निमंत्रक पदी निवड  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads