भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांची नियुक्ती
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी ग्रामीण मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांची राज्याच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती या राज्यमंत्री दर्जा असलेल्या समितीवर गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे . आमदार मोरे यांची नियुक्ती होताच तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आपल्या निस्वार्थ कार्याची दखल पक्षश्रेष्ठी व वरिष्ठांनी घेतली हि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी मोठी बाब असून भविष्यात देखील पक्षसंघटना वाढीसाठी व नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन अशी प्रतिक्रिया आमदार शांताराम मोरे यांनी दिली आहे.
भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांची नियुक्ती
Reviewed by News1 Marathi
on
November 06, 2020
Rating:

Post a Comment