Header AD

भाजप युवा मोर्चा डोंबिवली पूर्व शहर सचिवपदी सुमित चौधरी यांची नियुक्ती
डोंबिवली , शंकर जाधव  :  नेहमी समाजकार्यात झोकून घेत समाजातील गोर गरीब लोकांना न्याय मिळवून देणारे सुमित चौधरी यांची भाजप युवा मोर्चा डोंबिवली पूर्व शहर सचिवपदी नियुक्ती झाली आहे. सुमित हे तरुण वर्गात प्रसिद्ध असून तरुणांना बरोबर घेऊन समाजसेवा करत असतात.सदैव लोकांसाठी उभे राहणारे सुमित हे भाजपा पक्षात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात.आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांची या पदावर नियुक्ती केली.


कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, युवा मोर्चा डोंबिवली पूर्व अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पूर्व महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील, डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष नंदू जोशी,डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षा मनीषा राणे यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.सुमित चौधरी यांनी भाजपा पक्षाच्या वाढीसाठी सदैव जोरदार प्रयत्न राहीन आणि जनतेच्या न्यायहक्कासाठी काम करत राहीन असे सांगितले.

भाजप युवा मोर्चा डोंबिवली पूर्व शहर सचिवपदी सुमित चौधरी यांची नियुक्ती भाजप युवा मोर्चा डोंबिवली पूर्व शहर सचिवपदी सुमित चौधरी यांची नियुक्ती Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads