कोरोनामुळे मृत पावलेल्या ठाणे जिल्यातील पत्रकारांना आर्थिक मदत मिळावी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन
ठाणे , प्रतिनिधी : कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या ठाणे जिल्ह्यातील व शहरातील चार पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीचे निवेदन राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आज ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले. राज्यातील पत्रकारांना मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना तसेच दुर्घटनेत बळी पडलेल्या कुटुंबांना एकनाथ शिंदे यांनी मदत केली आहे तर काही मुलांचे पालकत्व ही स्वीकारले आहे त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.
तसेच पत्रकारांना टोलमधून सवलत मिळावी या मागणीचा ही या मागणीची आठवण करून देण्यात आली. ठाणे शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर डोंबिवली येथील विकास काटदरे तर मीरा भाईंदर येथील यतीन गोलतकर तसेच ठाण्यातील ठाणे टाइम्स चे संपादक प्रशांत कांबळी या चार पत्रकारांच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विकास काटे, उपाध्यक्ष गणेश पारकर, विभव बिरवटकर, मनोज देवकर,वसंत चव्हाण, प्रशांत मांडवकर, प्रफुल गांगुर्डे ,आदी पत्रकार या वेळी उपस्थित होते.
कोरोनामुळे मृत पावलेल्या ठाणे जिल्यातील पत्रकारांना आर्थिक मदत मिळावी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन
Reviewed by News1 Marathi
on
November 12, 2020
Rating:

Post a Comment