खासदार राजन विचारें कडून मिरा रोड च्या रेल्वे प्रवाशांना २ नविन सरकत्या जिन्यांची दिवाळी भेट
ठाणे , प्रतिनिधी : खासदार राजन विचारे यांनी आपल्या मतदार संघातील मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असताना त्यांनी मिरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पूल, लिफ्टची व्यवस्था, तिकीट खिडकी, सरकते जिने, पाणपोई, बसण्यासाठी आसन व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. ज्येष्ठ नागरिकांना प्रवाशांसाठी लिफ्ट व सरकत्या जिन्यांची जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी सतत पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट घेत होते.
नुकताच मीरा रोड रेल्वे स्थानकात फलाट कं. २-३ व फलाट क्र ४ येथे नवीन ३ सरकते जीन्यांपैकी २ सरकते जिने तयार असताना सुद्धा लोकार्पण करण्यास विलंब करीत असल्याचे खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून दिवाळीपूर्वी पूर्ण झालेले २ नवीन सरकते जिन्यांचा लोकार्पण करा असे रेल्वे प्रशासनाला बजावले होते. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मीरा रोड स्थानकातील जीन्यांचा लोकार्पण सोहळा झूम अॅप द्वारे खासदार राजन विचारे यांनी केला असून कार्यक्रमाला प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावरती स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे उप जिल्हा प्रमुख शंकर वीरकर, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, विरोधी पक्ष नेता प्रवीण पाटील, कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रमोद सावंत, नगरसेविका तारा घरत, हर्षदा कदम, नगरसेवक राजू भोईर, कमलेश भोईर, राजू नेहरा, अश्रफ शेख, अश्विन कसोदिया, अनंत शिर्के झ्त्यादी व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच नव्याने पुढील सुविधा उपलब्ध होणार आहेत
1. मिरारोड फालाट क्र. १ व ४ वरती नवीन लिफ्टची सुविधा.
2. भाईंदर रेल्वे स्थानकात फालाट क्र. ६ वरती १ सरकता जिना.
3. भाईंदर रेल्वे स्थानकात फालाट क्र. ३, ४ वर उत्तर व दक्षिण दिशेस लिफ्टची सुविधा.
4. भाईंदर स्थानकात फालाट क्र. १ वरती उत्तर दिशेस १ सरकत जिना व लिफ्टची सुविधा.
5. भाईंदर स्थानकात दक्षिण दिशेस १० मीटर रुंदीचा पादचारी पूल.
6. स्टेशन मास्तर यांचे कार्यालय तसेच इतर कार्यालय तोडून नवीन इमारत बांधणार आहेत.

Post a Comment