Header AD

डॉ.धनश्री साने यांच्या हस्ते “नर्मदा मैया एक संचित” पुस्तकाचे प्रकाशन
डोंबिवली  ,  शंकर जाधव  :  पूर्वेकडील औद्योगिक निवासी विभागातील पंडितस् किचन डायनिंग हॉलमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात कोरोना विषयक निर्बंधांची खबरदारी घेत पुस्तक प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा डोंबिवलीच्या सरचिटणीस डॉ. धनश्री  साने यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री गणेश मंदिर संस्थानच्या विश्वस्त तथा विश्व हिंदू परिषदेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या गौरी कुंटे, धनंजय साने, कमलाकर क्षीरसागर, उदयन आचार्य, रमेश वैद्य, चित्रा इनामदार, हेमंत इनामदार, लेखक सुनील जोशी आदी उपस्थित होते.  “सत्यप्रतिष्ठायां क्रियाफळाश्रयव्रम” या पतंजली योगसुत्राप्रमाणे अतिशय श्रध्येने परिक्रमा करणाऱ्यांना मनातल्या इच्छा आपोआप पूर्ण होतात. नर्मदा मैयेच्या ई च्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात याची वारंवार प्रचिती येते. “नर्मदा मैया – एक संचित” पुस्तकात मठ, मंदिर आणि आश्रशाळा याची सविस्तर माहिती आहे. परिक्रमेपुर्वी परिक्रमा करीत असतांना नवख्या लोकांच्या दृष्टीने पुस्तक खूपच उपयोगी आहे असे प्रतिपादन डॉ. धनश्री साने यांनी यावेळी  केले. पायी तीन वेळा परिक्रमा करणारे आचार्य म्हणाले, भारतात ही एकच परिक्रमा अशी आहे कि खिशात एकही पैसा नसतांना गरिबातला गरीब माणूस ही परिक्रमा करू शकतो त्यांनाही हे पुस्तक नक्कीच भावेल तर क्षीरसागर म्हणाले हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. लेखक सुनील जोशी म्हणाले, यावेळी इच्छा असूनही मित्रांना बोलावू शकलो नाही.

डॉ.धनश्री साने यांच्या हस्ते “नर्मदा मैया एक संचित” पुस्तकाचे प्रकाशन डॉ.धनश्री साने यांच्या हस्ते “नर्मदा मैया एक संचित” पुस्तकाचे प्रकाशन Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads