Header AD

आतकोली येथे आ.शांताराम मोरे यांच्या हस्ते चौकाचे व अंगणवाडीचे उद्घाटन

 भिवंडी ,  प्रतिनिधी  :  तालुक्यातील पडघ्याजवळील आतकोली येथील उद्योजक स्व. मारुतीशेठ भोईर चौक व अंगणवाडीचे विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन करण्यात आले.ग्रुपग्रामपंचायत भादाणे अंतर्गत आतकोली गावाच्या प्रवेशद्वारावरील चौकात पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य प्रकाश भोईर, उपसरपंच प्रदीप भोईर यांच्या प्रयत्नाने नांगरधारी शेतकर्‍यांचा प्रतीकृती पुतळा बसवण्यात आला आहे.त्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून स्व. मारुतीशेठ शंकर भोईर चौक असे नामकरण करण्यात आले आहे.


या चौकाचे उद्घाटन आमदार शांताराम मोरे व जिल्हा परिषद फंडातून उभारण्यात आलेल्या राऊतपाडा आतकोली अंगणवाडीचे उद्घाटन जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम माजी सभापती व विद्यमान सदस्या वैशाली विष्णू चंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस पाटील कांचन राऊत ग्रामपंचायत सदस्या भालेकर, विकास थेटे, कुणबी सेना तालुका अध्यक्ष भगवान सांबरे,उद्योजक सुभाष कथोरे,अजय पाटील,दिनेश भोईर,संदीप भोईर ,माजी सरपंच रविंद्र भोईर, हरेश राऊत, विजय भोईर, उल्हास भोईर, योगेश भोईर, भगवान राऊत,राजाराम शेलार ,अंनता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. 


जगाचा पोंशीदा असणारा शेतकऱ्यांचा सर्वांनाच विसर पडत चालला आहे.त्यामुळे या चौकात आपल्या ढवळयापोवळया बैलजोडीसह नांगरधारी शेतकऱ्याचा प्रतीकृती पुतळा बसवल्याने नागरीक , शालेय विद्यार्थ्यांच्या मनात शेतकऱ्यांबद्दल नक्कीच आदर निर्माण होईल असे आमदार शांताराम मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी भोईर कुंटुबाचे विशेष कौतूक करण्यात आले.तर नुकत्याच शहीद झालेल्या जवानांना उपस्थितांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली यावेळी आतकोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.
आतकोली येथे आ.शांताराम मोरे यांच्या हस्ते चौकाचे व अंगणवाडीचे उद्घाटन आतकोली येथे आ.शांताराम मोरे यांच्या हस्ते चौकाचे व अंगणवाडीचे उद्घाटन Reviewed by News1 Marathi on November 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads