Header AD

दिवाळी दरम्यान गुंतवणुकदारांनी कुठे गुंतवणूक करावी?
बहुप्रतिक्षित दिवाळी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दीपावलीचा हा प्रकाशोत्सव आपल्या आयुष्यात आनंद व समृद्धी घेऊन येतो. दिवाळीच्या या पवित्र प्रसंगी गुंतवणूक केली जाते आणि काही काळानंतर या गुंतवणुकीचे मूल्य काही पटींनी वाढते, अशी धारणा त्यामागे आहे. गुंतवणुकीसाठी अनेक वित्तीय साधने उपलब्ध आहेत. पण दिवाळीच्या सणासाठी गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्यायाबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ प्रभाकर तिवारी.


सोने आणि चांदी: पूर्वीच्या काळी गुंतवणुकीचे फार मार्ग नसल्यामुळे सोने आणि चांदी हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय ठरला. या धातूंच्या किंमती सतत वाढत राहतात, असेही म्हटले जाते. तथापि, सध्याचे वास्तव वेगळे आहे आणि गुंतवणुकीसाठी अनेक पर्यायही उपलब्ध आहे. या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकदाराने त्याच्या पोर्टफोलिओपैकी ५ ते ८ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करू नये.


म्युच्युअल फंड्स: म्युच्युअल फंड हे तरलता आणि व्यावसायिक व्यवस्थापनासाठी गुंतवणुकदारांकरिता उपयुक्त गुंतवणूक पर्याय आहे. त्यातून अधिक चांगले परतावे मिळतात. पोर्टफोलिओत वैविध्य येते आणि गुंतवणुकीत लवचिकता येते. गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुक-उद्देश्यानुसार, डेब्ट फंड, इक्विटी किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडचा पर्याय निवडू शकतात. म्युच्युअल फंडासाठी जोखिमीची भूक आवश्यक असल्याने वित्तीय सल्लागारांची मदत घेणे कधीही लाभकारक ठरते.


इक्विटी: इक्विटी गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन योजनेत बहुपटीने उत्पन्न मिळू शकते. मात्र यात समांतररित्या जास्त जोखीम असते. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी. इक्विटीमध्ये गुंतवणूकदाराने त्याच्या पोर्टफोलिओपैकी १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करू नये. इक्विटी हे म्युच्युअल फंडाइतकेच तरल असतात म्हणूनच ते जास्त पसंत केले जातात.

दिवाळी दरम्यान गुंतवणुकदारांनी कुठे गुंतवणूक करावी? दिवाळी दरम्यान गुंतवणुकदारांनी कुठे गुंतवणूक करावी? Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads