Header AD

ओकिनावाची झेस्टमनीसह भागीदारी ग्रा हकांना सुलभ ईएमआय सुविधा देण्यासाठी आले एकत्र
मुंबई, २ नोव्हेंबर २०२० : ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर भर असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने भारताचे आघाडीचे एआय-संचालित ईएमआय फायनान्सिंग व 'बाय नाऊ, पे लेटर' व्यासपीठ झेस्टमनीसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून ग्राहकांना कंपनीच्या दुचाकी उत्पादनांच्या संपूर्ण रेंजवर ईएमआय फायनान्सिंगची सुलभ सुविधा देण्यात येणार आहे. या सहयोगामुळे आता पूर्वीचा कोणताही सिबिल स्कोअर नसलेल्या ग्राहकांना देखील ओकिनावा उत्पादने खरेदी करताना फायनान्सिंग पर्यायाचा लाभ घेता येणार आहे.


 

ग्राहक डिजिटल केवायसी पूर्ण करत आणि खरेदीच्या वेळी त्यांच्या सोयीनुसार परतावा योजनेची निवड करत झेस्टमनीकडून क्रेडिट मर्यादेचा लाभ घेऊ शकतात. ही प्रक्रिया कागदपत्रविरहित आहे आणि कोणत्याही शारीरि‍क संपर्काशिवाय ऑनलाइन करता येऊ शकते. ही सुविधा भारतभरातील सर्व ३५० हून अधिक ओकिनावा डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे. तसेच, ग्राहक ओकिनावा वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन उत्पादन बुकिंग करताना देखील या सेवेचा लाभ घेऊ शकतात.


 

ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक व सह-संस्थापक श्री. जीतेंदर शर्मा म्हणाले, 'महामारीमुळे अनेक लोक शेअर्ड मोबिलिटीची निवड करण्याबाबत संकोच करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग आता जीवनशैलीचा भाग बनले आहे आणि लोक वैयक्तिक वाहनांचा वापर करत आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्याच्या एका महिन्यामध्येच इलेक्ट्रिक दुचाकींसाठीच्या मागणीमध्ये वाढ दिसण्यात आली. यामधून दिसून येते की, लोक त्यांच्या मालकीची वाहने खरेदी करण्यासोबत आयसीईपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना अधिक प्राधान्य देत आहेत. सद्यस्थितीमध्ये लोक त्यांच्या आर्थिक नियोजनांबाबत संघर्ष करत असताना आम्ही आमच्या ग्राहकांना फायनान्ससंदर्भात विनासायास वाहन खरेदी करण्यामध्ये मदत करण्यासाठी झेस्टमनीसोबत सहयोग केला आहे.


ओकिनावाची झेस्टमनीसह भागीदारी ग्रा हकांना सुलभ ईएमआय सुविधा देण्यासाठी आले एकत्र ओकिनावाची झेस्टमनीसह भागीदारी ग्रा हकांना सुलभ ईएमआय सुविधा देण्यासाठी आले एकत्र Reviewed by News1 Marathi on November 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण परिमंडलात वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर

  ■वर्षभरापासून बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा होतोय   खंडित.... कल्याण , कुणाल  म्हात्रे :   महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबा...

Post AD

home ads