Header AD

भिवंडी एसटी आगाराच्या नूतनी करणा सोबतच बस फेऱ्या वाढविण्याची आमदार रईस शेख यांची मागणी

भिवंडी ,  प्रतिनिधी  :   यंत्रमाग कारखाने व गोदाम पट्टा असल्याकारणाने भिवंडीत मजुरांसह प्रवासी नागरिकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातच रेल्वेची हवी तशी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रवासासाठी परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.भिवंडीतून बस फेऱ्या वाढवून नागरिकांचा प्रवास सुखकर करावा तसेच भिवंडी आगाराचे नूतनीकरण करावे व भिवंडी ते मंत्रालय व भिवंडी अंधेरी थेट बसची व्यवस्था करावी अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.विशेष म्हणजे या संदर्भात मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपल्या काही मागण्या मान्य केल्या असून बस आगाराच्या नूतनीकरणासंदर्भात परिवहन विभागाचे अभियंता व अधिकारी स्वतः पाहणी करून त्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतील अशी माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे . 


भिवंडी शहरात व शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात यंत्रमाग व गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने शहरातील कानाकोपऱ्यातून महिला व नागरिक कामासाठी जात असतात . मात्र भिवंडीत पालिका अथवा शासकीय परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने कामगारांसह प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे . त्यातच या खासगी वाहनांमध्ये कोणतीही सुरक्षा नसल्याने परिवहन विभागाने भिवंडी शहरातून लहान आकाराच्या बस सुरु कराव्यात त्याचबरोबर बस आगाराच्या मोकळ्या जागेत परिवहन विभागाच्या शिबिरासाठी जागेची व्यवस्था करावी अशी मागणी देखील आमदार शेख यांनी परिवहन मंत्री परब यांच्याकडे केली आहे.

भिवंडी एसटी आगाराच्या नूतनी करणा सोबतच बस फेऱ्या वाढविण्याची आमदार रईस शेख यांची मागणी भिवंडी एसटी आगाराच्या नूतनी करणा सोबतच बस फेऱ्या वाढविण्याची आमदार रईस शेख यांची मागणी Reviewed by News1 Marathi on November 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads