Header AD

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा ३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास एक चोरटा गजाआड
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात घुसून  बंदुकीच्या धाकावर दुकानातील लाखोंचा ऐवज लुटून पसार झाले. याच दरम्यान या चोरट्यानी धारधार शस्त्राने ज्वेलर्सचे मालक आणि कर्मचाऱ्याला जखमी केले. दरम्यान या झटापटीत एका चोरट्याला दुकान मालकाने पकडले. तर त्याचे साथीदार मात्र पसार झाले. या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या पसार झालेल्या दोन्ही साथीदारांचा शोध सुरू केला आहे. हा लुटीचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून भरदिवसा घडलेल्या या घटनेने कल्याणात खळबळ उडाली आहे.


कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरात वैष्णवी ज्वेलर्स  दुकान आहे. या दुकानात काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तीन चोरटे शिरले. दुकानात शिरताच संधी साधून त्यांनी अपल्याजवळील हत्याराने कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील ३० तोळे दागिने आणि १ लाख ६० हजारांची रोकड घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला. 


या दरम्यान झालेल्या झटापटीत यामधील एक चोरटा कर्मचाऱ्यांच्या हाती लागला तर त्याचे दोन्ही साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.  ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. तीन पैकी दोन चोरटे संधीचा फायदा घेत पळून गेले. या चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी या चोरट्याला अटक करत पसार झालेल्या त्याच्या दोघा साथीदारांचा शोध सुरू केला असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे व.पो.नि.  शाहूराजे साळवे यांनी दिली.

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा ३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास एक चोरटा गजाआड भरदिवसा बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स दुकानावर दरोडा ३० तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास एक चोरटा गजाआड Reviewed by News1 Marathi on November 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

प्रकाश आंबेडकरांनी घेतली एनआरसीच्या आंदोलक कामगारांची भेट

■मी आणि माझे कुंटुंब पुरतेच सरकार मर्यादीत   प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   एनआरसी कामगारांची थकीत देणी म...

Post AD

home ads