Header AD

कल्याण डोंबिवलीत १९७ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५३,९५७ एकूण रुग्ण तर १०५९ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १७५ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १९७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १९७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 

५३,९५७ झाली आहे. यामध्ये १७५७ रुग्ण उपचार घेत असून ५१,१४१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १९७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ३२कल्याण प – ५९डोंबिवली पूर्व – ५९डोंबिवली प – ३७मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील ४ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११ रुग्ण टाटा आमंत्रामधून  व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १९७ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १९७ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads