दीपोत्सवच्या माध्यमातून कोरोनाची जनजागृती
ठाणे , प्रतिनिधी : ठाण्यातील कशिश पार्क मधील नागरिकांनी दीपोत्सवच्या माध्यमातून कोरोनाची जनजागृती केली आहे.सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे यामुळे दिवाळीचा सण देखील अत्यंत सध्या पद्धतीने साजरी केली जात आहे.श्री सिद्धिविनायक सेवा समिती कशिश पार्क,ठाणे यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात येतो परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत सध्या पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या" माझे कुटुंब माझी जबाबदारी" यासंकल्पनेवर आधारित दीपोत्सव करण्यात आला यावेळी नगरसेवक व शिक्षण मंडळ सभापती विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले - जाधव आदीसह प्रभागातील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.
दीपोत्सवच्या माध्यमातून कोरोनाची जनजागृती
Reviewed by News1 Marathi
on
November 14, 2020
Rating:
Post a Comment