Header AD

चिनी मालावरील बहिष्कार भारतीयांच्या पथ्यावरडोंबिवली  | शंकर जाधव  :  जगभरातील चीनविरोधी तीव्र भावना आणि अमेरिकेने चीनमधून आयात केलेल्या मालावर मोठ्या प्रमाणात शुल्क लादल्यामुळे भारतीय कंपन्यांची उत्पादने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता आहे. अशी माहिती ” वर्मोरा समूहाचे संस्थापक रमणभाई वर्मोरा यांनी दिली. टाईल्स उद्योगात गेल्या काही वर्षात भारतने मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे. भारतातील वस्तूचा टिकाऊ दर्जा लक्षात घेता अनेक देशातून भारतीय मालाला पसंती मिळत आहे. आर्थिक वर्षात टाईल्स उत्पादन माध्यमातून १६००   कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष्य केले असून सध्या ते ७० देशांमधून १०० पेक्षा अधिक देशांना भारतातुन टाईल्सची होणार असल्याचे चिन्ह आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवार अनेक कुटुंब शहरी भागातून विस्थापित झाले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही गृहनिर्माण क्षेत्रात कमालीची वाढ झाली. त्यामुळे बांधकामाला लागणार्‍या साहित्या ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. याचा चांगला परिणाम म्हणजे टाइल्स च्या मागणीत मोठ्या वाढ दिसून येत आहेत. हीच परिस्थिती इतर देशातही पाहायला मिळत असून चीनी बनावटीच्या मालाला मागणी कमी झाली.  त्यामुळे येत्या काळात भारतिय बनावटीच्या वस्तुना बाजारपेठ उपलब्ध होणार असून भारतीय व्यावसायिकांना ही संधी असल्याचे मत वरमोरा यांनी व्यक्त केले. चिनी मालावरील बहिष्कार भारतीयांच्या पथ्यावर  चिनी मालावरील बहिष्कार भारतीयांच्या पथ्यावर Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads