Header AD

शासनाने लुटमारीचा प्रकार न थांबल्यास आंदोलन करू ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

 


अकोला, दि. १० :  महाराष्ट्र शासन कायद्याप्रमाणे चालणार नाही असा विडाच त्यांनी उचलल्याचे दिसत असून २०१९ च्या नीट परीक्षांमध्ये शासनाने एससी, एसटी व ओबीसी यांचे आरक्षण २५ टक्क्यांवर आणले. परंतु एसईबीसीला सोळा टक्के तर ईडब्ल्यूएसला दहा टक्के आरक्षण देण्यात आले. त्यात कुठल्याही प्रकारची कपात न करता हे आरक्षण कायम ठेवण्यात आले. हा जो लुटमारीचा प्रकार आहे, या लुटमारी प्रकाराच्या विरोधात आपण लढा देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.


शासनाला आम्ही विचारतोय एसईबीसी व ईडब्ल्यूएसचा वर्ग तुमचे जावई आहात का ? उरलेले ओबीसी, एससी, एसटी हे नाकर्ते ची मुले आहेत का ? याचा खुलासा आपण करावा, अन्यथा आंदोलना शिवाय दुसरा मार्ग राहणार नसल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी सुरेश नंदिरे यांनी दिली.

शासनाने लुटमारीचा प्रकार न थांबल्यास आंदोलन करू ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा शासनाने लुटमारीचा प्रकार न थांबल्यास आंदोलन करू ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२७ रुग्ण तर दोन मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात   आज   २२७    कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून     गेल्या २४ ता...

Post AD

home ads