Header AD

कोरोनावार मात करून आलेले केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि सौ.सीमाताई आठवले यांचे रिपाइं कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत

 मुंबई , दि.8  :  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांनी 12 दिवस  वैद्यकीय उपचार घेऊन  कोरोना वर मात केली आहे. आज  सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर बांद्रा येथील त्यांच्या संविधान  निवासस्थानी ना. रामदास आठवले यांचे सपत्नीक आगमन होताच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड आनंद उत्साहात भव्य स्वागत केले. ढोल ताशा संबळ च्या तालावर ठेका धरून  आणि गुलाब पाकळ्यांच्या पुष्प वर्षावात हर्षोल्हासात ना. रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कोण आला रे कोण आला  आर पी आय चा वाघ आला या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 


केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना व त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले यांना  मुंबईत एका खाजगी रुग्णालयात दि. 27 ऑक्टोबर रोजी  दाखल करण्यात आले होते.  त्या बातमी मुळे रिपाइं कार्यकर्त्यांचे तोंडचे पाणी पळाले होते. सर्व रिपाइंकार्टकर्ते  चिंताग्रस्त होते. गो कोरोनाचा नारा देऊन  संपूर्ण जगाला कोरोना विरुद्ध लढण्याची ऊर्जा प्रेरणा हिम्मत देणारे ना रामदास आठवले हे झुंजार पँथर आहेत.


त्यामुळे कोरोना ला हरवून आपला संघर्षनायक नेता निश्चित लवकर घरी  सुखरूप येईल असा विश्वास कार्यकर्त्यांना चाहत्यांना होता.त्यानुसार 12 दिवस औषधोपचार घेऊन कोरोनावर  मात करून ना रामदास आठवले आज बांद्रा येथील संविधान निवासस्थानी सुखरूप सपत्नीक आले. त्यांचे हर्षोउल्हासात रिपाइं कार्यकर्त्यांनी आनंदाने नाचत स्वागत केले.कुमार जित आठवले यांच्यासह सर्व आठवले कुटुंबीय उपस्थित होते.


यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; महाराष्ट्र युवक अध्यक्ष पप्पू कागदे; रमेश गायकवाड; ऍड.अभयाताई सोनवणे;ऍड.आशाताई लांडगे; जयंतीभाई गडा; जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; प्रकाश कमलाकर जाधव; सोना कांबळे; रवी गायकवाड; स्वप्नाली जाधव; उषाताई रामळु; सुनील कटारे; दयाळ बहादूर;विवेक पवार;अमित तांबे;चंद्रशेखर कांबळे; घनश्याम चिरणकर; रतन अस्वारे; आदीनाग रणधीर;विनोद चांदमारे; बाळासाहेब भागवत ; कुणाल व्हाव्हळकर; अरुण पाठारे; रमेश पाईकराव; योगेश शिलवंत , आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोरोनावार मात करून आलेले केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि सौ.सीमाताई आठवले यांचे रिपाइं कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत कोरोनावार मात करून आलेले केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि सौ.सीमाताई आठवले यांचे रिपाइं कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत Reviewed by News1 Marathi on November 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads