राया-खडवली रस्ता बनलाय अपघाती मुत्युचा सापळा रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य, खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील राया खडवली रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने या रस्त्यावर अनेक अपघातच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वाहंनानी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टागंणीला लागत असून अपघात घडु नये अशी दक्षता घेत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
टिटवाळा स्टेशन ते खडवली स्टेशन परिसरासाठी रेल्वे समांतर राया खडवली रस्ता एमएमआररिजन मध्ये येत असुन जिल्हा परिषद निधी अभावी रस्ता करु शकत नाही. आजच्या घडीला अगदी डोंगराळ- दुर्गम भागात देखील उत्तम रस्त्यांचे जाळे पसरले आहे. पण रहदारी असलेला कल्याण तालुक्यातील राया -खडवली रस्ता मात्र आजतागायत दुर्लक्षित राहिला आहे. ह्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आजपर्यंत कित्येक अपघात झाले आहेत. नुकताच एका मोटारसायकल स्वाराचा अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोन दिवसांत ह्या रस्त्यावर विविध ४ अपघात झाले असून आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर शासन ह्या रस्त्याचा विषय गंभीरतेने घेईल असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या रस्त्यातून वाहने चालविताना मरणाची कसरत करावी लागते. या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था सध्या या रस्त्याची झाली आहे.
राया खडवली रस्ता हे अतंर सुमारे साडेचार किलोमीटर असुन रस्त्याच्यी रूंदी ७ मीटर असुन या रस्त्याचे लाखो रूपये खर्च करून खडीकरण करण्यात आले होते. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली असुन टिटवाळा मोहने, शहाड, आंबिवली, निंबवली फळेगाव, उशीद निबंवली, राया, खडवली आदी गावांचा पडघा येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग असला तरी याकडे दुर्लक्ष होत आहे.
वाढते शहरीकरण पाहता हा रस्ता होणे ही काळाची गरज आहे. राया खडवली रस्त्याच्या राया येथे सुमारे दीड कोटी रूपये खर्च करून सुमारे पाचशे मीटर रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आला. परंतु पुढील रस्त्याच्यी दुरावस्था कायम आहे. आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनधीही या रस्त्याच्या समस्येबाबत ढुंकूनही लक्ष देत नाहीत असा आरोप होत आहे. राया खडवली रस्त्याचा कायापालट कधी होणार असा सवाल यानिमित्ताने उभा राहिला आहे.
"कल्याण पंचायत समिती बांधकाम विभाग उप अभियंता संदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता राया खडवली रस्त्याच्या कामाचा सुमारे ५ कोटीचा प्रस्ताव असुन याबाबत वेळोवेळी जिल्हा परिषदकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असुन निधी उपलब्ध होत नाही." निधी अभावी काम प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.तर जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राया खडवली रस्ता होण्याबाबत पाठपुरावा सुरू असुन राया निंबवली रस्त्याचे काम मार्गी लागले आहे."

Post a Comment