Header AD

दिवाळीतील ट्रेडिंग सेशनच्या मुहूर्ताचे महत्व
मुहूर्त ट्रेडिंग हे विशेष प्रतिकात्मक व्यापारी सत्र असून ते दिवाळीत स्टॉक एक्सचेंजमध्ये असते. बीएसई आणि एनएसई ‘शुभ मुहूर्त’ किंवा शुभ वेळेनुसार, एक तास व्यापारी सत्र आयोजित करतात. या सत्रादरम्यान व्यापार केल्याने गुंतवणुकदारांची वर्षभर भरभराट होईल व त्यांच्याकडे समृद्धी नांदते, असे म्हटले जाते. याकडे पाहण्याची आणखी काही कारणे आहेत. मुहूर्त ट्रेडिंमध्ये प्रामुख्याने खरेदीच्या ऑर्डर असतात. त्यामुळे बाजारात वेग येतो आणि बाजार सकारात्मक बिंदुवर बंद होतो. याबद्दल अधिक माहिती देताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी.  


भारतीय गुंतवणुकदारांसाठी दिवाळी का विशेष आहे?

दिवाळी हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचे, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावरील ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतीक आहे. दिवाळीच्या आध्यात्मिक महत्त्वासोबतच, पारंपरिक हिंदू लेखा वर्षाची सुरुवात करतात, त्याला ‘संवत’ असे म्हणतात. संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मी आणि प्रारंभाची देवता गणेश यांचीही दिवाळीला पूजा केली जाते.  


भारतीय लेखा पुस्तके आणि त्यांच्या पैशांच्या खजिन्याचा सन्मान करण्यासाठी पूजा करतात. व्यवसाय आणि दुकानांमध्ये जुनी लेखा पुस्तके बंद केली जातात. सकारात्मक बिंदूवर नव्या लेखावर्षाची सुरुवात नव्या हिशोब वहिने केली जाते. ग्राहकांच्या व्यापारी सत्रापूर्वी, गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर्स लक्ष्मी आणि गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी ‘चोपडा पूजन’ करतात. मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान सर्वत्र सकारात्मक लहरींसह गुंतवणूक करण्याचे चांगले कारण आपल्या मिळते.


मुहूर्त ट्रेडिंगची वेळ, तिचे महत्त्व आणि तुम्ही गुंतवणूक का करावी?: दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केट बंद असले तरी, मुहूर्त ट्रेडिंग सेशन्स जवळपास एक तासासाठी सुरू राहते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दरवर्षी बदलत राहते. त्या दिवसातील शुभ समजल्या जाणा-या वेळेनुसार, ही वेळ ठरवली जाते. व्यापारी समुदाय जवळपास निम्म्या शतकापेक्षा जास्त काळापासून ही परंपरा पाळत आहेत. १९५७ पासून बीएसई हे विशेष ट्रेडिंग सेशनचे आयोजन करत आहे. त्यानंतर १९९२ पासून एनएसईद्वारे याचे आयोजन होत आहे. या वर्षी स्टॉक एक्सचेंज १४ नोव्हेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान याचे आयोजन करणार आहे.


मुहूर्त ट्रेडिंग सेशनदरम्यान, गुंतवणूकदार आणि ब्रोकर्स मूल्य-आधारीत स्टॉक्स खरेदी करतात, जे दीर्घकाळासाठी चांगले असतात. या विशिष्ट मुहूर्तावेळी ग्रहांची दशा अशा प्रकारे असते, ज्याद्वारे गुंतवणूकदाराचे पुढील संपूर्ण संवतातील भविष्य उज्ज्वल राहते, अशी मान्यता आहे. अनेक गुंतवणूकदार म्हणतात की, या वेळी घेतलेले स्टॉक्स त्यांच्यासाठी लकी ठरतात. ते शेअर्स खरेदी करतात आणि पुढील पिढीकडेही त्याचा वारसा देतात. काहीतरी नवीन सुरू करण्यासाठीदेखील दिवाळी हा आदर्श दिवस मानला जातो. या विशेष ट्रेडिंग सेशनमध्येच बरेच लोक शेअर बाजारातील गुंतवणुकीची सुरुवात करतात.


या घडामोडींमुळे, मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये बाजार उसळलेला दिसून येतो. गुंतवणुकदारांच्या भावना सकारात्मक असतात, कारण बहुतांश क्षेत्रात खरेदी होते.  या दिवशी स्टॉकच्या किंमती स्थिर राहतात कारण बहुतांश गुंतवणूकदार विक्रीपेक्षा खरेदी करण्याला पसंती देतात. मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान गुंतवणूकदार मौल्यवान गुंतवणूक करताना दिसून येतात.


त्यामुळे हा दिवस शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी, मोठ्या खरेदीसाठी, टोकन गुंतवणूक किंवा पहिल्यांदा खरेदीसाठी एक योग्य दिवस आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता अधिक मौल्यवान स्टॉक्स खरेदी करणे महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांना गुंतवणूकदारांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत स्थान आहे. मात्र शेअर बाजारातील यशाकडे हात पुढे करण्यापूर्वी योग्य आर्थिक विश्लेषण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दिवाळीतील ट्रेडिंग सेशनच्या मुहूर्ताचे महत्व दिवाळीतील ट्रेडिंग सेशनच्या मुहूर्ताचे महत्व Reviewed by News1 Marathi on November 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads