Header AD

फुटबॉल स्पर्धे साठी सराव करताना हीरानंदानी घोडबंदर रोड ठाणे येथल्या मैदानात मुले खेळताना दिसत आहेत


   छाया : प्रफुल गांगुर्डे

ठाणे , प्रतिनिधी  :  हिरानंदानी यांग फुटबॉल अकॅडमी ,एचवायएफए, हा ठाण्यातील एकमेव संघ आहे जो कोरोना सारख्या साथीच्या आजारानंतर मैदानात परतला आहे आणि खेळाडू यांना जवळ जवळ सहा महिन्यांनी मैदानात परत येण्याचा खूप आनंद झाला गेल्या सहा महिन्यांपासून घर च्या घरी खेळाडूंनी ऑनलाइन च्या माध्यमातून खूप मेहनत घेतली होती, त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न ही केले पण फुटबॉल हा असा खेळ आहे की जो मैदानात खेळल्याशिवाय खेळता येत नाही आणि  मुलांना  तंदुरुस्त ठेवण्यात ही चांगला खेळ समजला जातो पण घरी आपण शंभर टक्के  देऊ शकत नाही त्या साठी मैदानात उत्तरावेच लागते असे फुलबॉल प्रशिक्षक लोसियस वाझ यांनी सांगितले .


त्यांनी सहा महिने ऑनलाइन च्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू ठेवले होते आणि टाळेबंदी खुली होण्याची वाट पाहत होते पण मुले घरात बसून ऑनलाइन कंटाळली होती त्यामुळे मुलही टाळेबंदी खुली होण्याची वाट पाहत होती आणि पुन्हा नव्या उत्साहात आणि नव्या जोमाने सर्व सुरक्षेची काळजी घेऊन सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटाइझर चा वापर करून पुढे होणाऱ्या फुटबॉल स्पर्धे साठी सराव करताना हीरानंदानी घोडबंदर रोड ठाणे येथल्या मैदानात दिसत आहेत आणि बऱ्याच दिवसांनी सर्व मित्र एकमेकांना भेटले होते आणि आनंद व्यक्त करत होते.

मुले खेळताना सांगत होती योग्य काळजी घेतली तर आपण कोरोना सारख्या आजारावर मात करू शकतो खेळल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि तीच मुलांना पाहिजे असते योग्य आहार व्यायाम मैदानी खेळ या दृष्टिकोनातून मुलाचा तंदुरुस्त पणा वाढण्यास मदत होते त्या मुळे कोरोना ला न घाबरता योग्य काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा असे सांगून मुले उत्साहात सराव करत होती पंधरा वर्षीय राईना चौहान हिने सांगितले की टाळेबंदी मुळे घरात बसून आम्ही खूपच बोर झालो होतो आता खुश आहोत मैदानात खेळायला मिळत आहे तिने सरकारचे ही आभार मानले आहेत.


आता सरकारने हळूहळू परवानगी दिल्या मुळे मूल आनंदी झाले असून पालकही मुलांना बघून आनंदी झाले आहेत मुलांना कोरोना विषयी भीती न बाळगता योग्य काळजी घेऊन त्यावर कशी मात करता येईल हे आम्ही मुलांना सांगुनच मैदानात पाठवयला सुरुवात केली आणि मुलं घरात बसून पण वैतागली होती त्यामुळे चिडचिड वाढली होती पण त्यांना आता शारीरिक तंदुरुस्ती साठी चालना मिळेल आणि मुले आनंदी राहतील मुले आनंदी राहिली तर पालकही आनंदी राहतील असे एक पालक सांगत होते त्यामुळे मुलंही खुश झाले आहेत आणि त्यांचे पालक ही खुश झाले आहेत.


फुटबॉल स्पर्धे साठी सराव करताना हीरानंदानी घोडबंदर रोड ठाणे येथल्या मैदानात मुले खेळताना दिसत आहेत फुटबॉल स्पर्धे साठी सराव करताना हीरानंदानी घोडबंदर रोड ठाणे येथल्या मैदानात मुले खेळताना दिसत आहेत Reviewed by News1 Marathi on November 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads