जिजाऊ सामाजिक संस्थेकडून ठाणे जिल्ह्यातील पोलीस भगिनींना "कृतज्ञतेची भाऊबीज"
भिवंडी , प्रतिनिधी : यंदाच्या दिवाळीची भाऊबीज ठाणे,पालघर जिल्ह्यातील हजारो आशा सेविका आणि परिचारिका यांच्यासाठी अविस्मरणीय ठरलेली असतानाच बुधवारी जिजाऊ परिवारातील सामाजिक कार्यकर्ते मनोज मरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्ह्यातील भिवंडी,कल्याण,मुरबाड,शहापूर,ठा णे शहर महिला पोलीस भगिनींसोबत जिजाऊ संस्थेकडून कृतज्ञेची भाऊबीज कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी जिजाऊ संस्थेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिकाताई पानवे,सचिव केदार चव्हाण, समाजसेविका नेत्रा म्हात्रे,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी पंकज पवार आदींसह संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोना काळामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झालेली असतांना नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे व त्यासाठीं अहोरात्र मेहनत घेऊन आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस भगिनींचा सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राजमाता जिजाऊंचा वारसा व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन निलेश सांबरे यांनी आम्हां सर्व भगिनींना भाऊबीज करून आमच्या पाठीमागे मोठा भाऊ म्हणून सदैव खंबीरपणे उभे असल्याची जाणीव करून दिली आहे.असे पोलीस भगिनींनी जिजाऊ कृतज्ञतेची भाऊबीज कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आनंदाने म्हटले व जिजाऊ परिवाराचे आभार मानले.
जिजाऊ सामाजिक संस्थेकडून ठाणे जिल्ह्यातील पोलीस भगिनींना "कृतज्ञतेची भाऊबीज"
Reviewed by News1 Marathi
on
November 18, 2020
Rating:

Post a Comment