Header AD

भिवंडीत झोपड्यांना लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यु ,चार झोपड्या जळून खाकभिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गजानन वाफेकर कंपाऊंड येथील झोपड्यांना रात्री साडे आठ वाजता लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या असून एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यु झाला तर ३ महिला जखमी होण्याची घटना घडली.भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबियांची वसाहत मोठ्या प्रमाणावर असून ,राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गजानन वाफेकर कंपाऊंड येथील गोदाम लगत २० झोपड्या असून रविवार असल्याने सर्व मोलमजुरी करणारे कुटुंबीय घरीच असल्याने सायंकाळी झोपडीत देवा समोर दिवा लावून ठेवला असता अचानक दिवा कलंडल्याने आग लागली ,कागदी पुठ्ठा ,प्लायवुड ,प्लास्टिक आच्छादन करून बनविलेल्या झोपड्या असल्याने ही आग झपाट्याने पसरल्याने या आगीच्या भक्ष्यस्थानी चार झोपड्या जळून खाक झाल्या .


या आगीमुळे येथील सर्व कुटुंबीयांनी एक एक करीत घराबाहेर पडून स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ८० वर्ष वयाची वृद्ध महिला  झोपडी बाहेर झटपट पडता न आल्याने आगीच्या ज्वालानी ती वेढली गेली व त्या आगीत तिचा होरपळून मृत्यु झाला आहे .लक्ष्मी शिवाजी म्हसकर असे मयत वृद्ध महिलेचे नाव असून या आगीत ज्योती गोपीनाथ सरे ,अंजु गोपीनाथ सरे,सुरेखा सुरेश राठोड या तीन महिला जखमी झाल्या आहेत .घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व स्थानिक नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग पूर्णपणे विझवली . या आगीत या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबियांचे पूर्ण संसार जळून खाक झाला असून घरातील कपडे ,पैसे दागिने हे जळून अतोनात नुकसान झाले आहे.
भिवंडीत झोपड्यांना लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यु ,चार झोपड्या जळून खाक भिवंडीत झोपड्यांना लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यु ,चार झोपड्या जळून खाक Reviewed by News1 Marathi on November 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads