Header AD

कोकणातील वादळग्रस्तांना आर्थिक मदत आणि शाळांना संगणक आ.संजय केळकर यांचा पुढाकार



ठाणे | प्रतिनिधी : निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील दुर्गम भागात प्रत्यक्ष पाहणी करुन  कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने वतीने येथील 10 शाळांना गेल्या एक महिन्यात 10 संगणक उपलब्ध करुन देण्यात आले. तर कष्टकरी वर्गातील व्यावसायिकांना 10 हजार रुपयांची मदत देण्यात आली.


कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थेचे आमदार संजय केळकर हे अध्यक्ष असून संस्था 1978 साली स्थापन झाली. विविध स्तरावर ही संस्था उल्लेखनिय कार्य करत आहे. कोरोनाचे संकट आणि  निसर्ग वादळामुळे कोकण भागातील जनजीवन उद्ध्वस्त झाले. शाळांचेही अतोनात नुकसान झाले. कोकण विकास प्रतिष्ठान अध्यक्ष, आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.


आ.केळकर आणि संस्थेने दापोली, मंडणगड तालुक्यातील हर्णे आणि विरसई या दुर्गम भागातील २०० गरजू गरीब, शिंपी, चर्मकार, नाभिक, छोटे दुकानदार अशा कष्टकरी व्यवसायिकांना १० हजाराचे मदतीचे धनादेश दिले. तर दुर्गम भागातील १० शाळांना संगणक देऊन शैक्षणिक कार्यात हातभार लावला.


कोकणातील वादळग्रस्तांना आर्थिक मदत आणि शाळांना संगणक आ.संजय केळकर यांचा पुढाकार कोकणातील वादळग्रस्तांना आर्थिक मदत आणि शाळांना संगणक आ.संजय केळकर यांचा पुढाकार Reviewed by News1 Marathi on November 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads