Header AD

ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

 



ठाणे , प्रतिनिधी  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या मार्फत बारवी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील फिडरवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवार दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


     शुक्रवार दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत शहरातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत( रूपादेवीपाडा, केनीनगर, नेहरूनगर, किसननगर, नं. २, वागळे फायर ब्रिगेड) माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत( कोलशेत गाव, बाळकूम), तसेच वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नळपाडा इत्यादी भागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे.


     या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार Reviewed by News1 Marathi on November 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

■शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेने प्रत्येक नवा गुंतवणुकदार उत्साही होतो, तसेच कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासह...

Post AD

home ads