फोडा फोडीचे राजकारण न करता काँग्रेस वाढीसाठी सदैव प्रयत्न करणार
■विरोधकांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळावे दयानंद चोरघे यांचे विरोधकांना आवाहन...
भिवंडी , प्रतिनिधी : भाजपच्या स्थानिक राजकारणाला वैताकून भाजपच्या प्रदेश सचिव पदासह भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात घरवापसी केलेल्या दयानंद चोरघे यांनी विरोधकांना जाहीर आवाहन करत येत्या वर्षभरात अनेक कार्यकर्त्यांना आपण काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याचा प्रयत्न कारणार असून विरोधकांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळावे असे आवाहन दयानंद चोरघे यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदे केले आहे. यावेळी दिवाळी निमित्त त्यांनी पत्रकारांना शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांना काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारले असता आपण भाजपमध्ये प्रदेश सचिव पदावर कार्यरत होतो मात्र त्या पक्षात स्थानिक पातळीवर आपले स्थान कोणत्या क्रमांकावर होते हे मला आजही माहित नाही मात्र काँग्रेसकडून मिळालेला सन्मान पदापेक्षा निश्चितच मोठा आहे.
अशी भावनिक प्रतिक्रिया चोरघे यांनी यावेळी दिली असून ३१ डिसेंबर पर्यंत मी जिल्ह्यातील गावोगावी दौरे करून व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या एका वर्षात विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यासाठी व काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून आगामी ग्राम पंचायती , पंचायत समिती , नगरपंचायत , महापालिका , जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येमध्ये काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेहि चोरघे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे सध्या जिल्ह्यात काही विरोधक कुटुंब फोडून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कुटुंबा कुटुंबात वाद लावण्याचे काम करत असून असे फोडा फोडीचे गलिच्छ राजकारण आपण कदापी करणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी याप्रसंगी दिले आहे.
फोडा फोडीचे राजकारण न करता काँग्रेस वाढीसाठी सदैव प्रयत्न करणार
Reviewed by News1 Marathi
on
November 18, 2020
Rating:

Post a Comment