Header AD

मंदिरे उघडण्याबाबतचा सरकारचा निर्णय हा भाजपच्या आंदोलनाचा विजय भाजप नेते माजी खासदार जगन्नाथ पाटील


पारनाका येथे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यलयाचे उदघाटन...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मंदिरे उघडण्याबाबतचा सरकारचा निर्णय हा भाजपच्या आंदोलनाचा विजय असल्याचे मत भाजप नेते माजी खासदार जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे. पारनाका येथे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यलयाचे उदघाटन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.  


भाऊबीज व पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजप भटके विमुक्त आघडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार  यांच्या पारनाकाजनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी मंत्री माजी खासदार व भाजप नेते जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जगन्नाथ पाटील यांनी अत्यंत शुभ मुहूर्तावर या कार्यलयाचे उदघाटन झाले असून या कार्यालतात जनसेवेची काम मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. ठाकरे सरकारने जो मंदिरे उण्याचा जो निर्णय घेतला. 


काल पासून भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात आली. याबाबत भाजपचे नेते व माजी खासदार व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले त्यामुळे सरकारवर दबाव आला आणि  भाजपच्या दबावाखाली सरकारने हा निर्णय घेतला, हिंदुस्थानातील नागरिकांसाठी हा निर्णय योग्य असून भाजपच्या आंदोलनाचा हा विजय असल्याचे पाटील यांनी सांगितले.


यावेळी शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, नगरसेवक दया गायकवाड, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष निखील चव्हाण, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनिल पंडित, मोहोने टिटवाळा मंडळ महिला अध्यक्ष मनीषा केळकर, संजय कारभारी, स्वप्नील काटे, निरजा मिश्रा, हेमा पवार, अनिल बोरनारे, महेंद्र मिरजकर, सदा कोकणे आणि पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

मंदिरे उघडण्याबाबतचा सरकारचा निर्णय हा भाजपच्या आंदोलनाचा विजय भाजप नेते माजी खासदार जगन्नाथ पाटील मंदिरे उघडण्याबाबतचा सरकारचा निर्णय हा भाजपच्या आंदोलनाचा विजय भाजप नेते माजी खासदार जगन्नाथ पाटील Reviewed by News1 Marathi on November 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads