वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर भीषण अपघात मद्यधुंद भरधाव डंपर चालकाची चार वाहनांना धडक एकाचा मृत्यू
भिवंडी ,प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने भरधाव वेगाने जात असताना सावरोली गावाजवळ एका छोट्या टेम्पोला उडविले आणि इतर तीन वाहनांना धडक दिली.यात टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला.
टेम्पोचालक यशवंत पाटील (४५) रा. दिघाशी हे आपल्या MH ०४ EL ९८६ या गाडीतून भाजीपाल्याची वाहतूक करणारे सकाळी नऊच्या सुमारास अंबाडीहुन वज्रेश्वरी दिशेने जात असताना अंबाडी दिशेला जाणाऱ्या गाडी क्र.MH०४ JK ७५२१ हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत असताना त्याने समोरून येणाऱ्या या छोट्या टेम्पोला उडविल्याने त्यात टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला.
सदर टेम्पो उडविल्यावर सदर डंपर चालकाने टेम्पोच्या मागून येणाऱ्या स्वीफ्ट आणि दुसऱ्या एका टेम्पोला धडक देऊन तिथून अंबाडी दिशेला पलायन करीत असताना झिडके फाटा येथे एका दुचाकीस्वाराला धडक दिली तेव्हा तेथील तरुणांनी सदर चालक माधव धोंडूबा ठगे वय ५० यास पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.या घटनेनंतर अंबाडी नाका येथील पोलीस चौकीमध्ये परिसरातील शेकडो तरुणांनी नागरिकांनी येऊन सदर चालकावर कडक कारवाईची मागणी केली.
वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर भीषण अपघात मद्यधुंद भरधाव डंपर चालकाची चार वाहनांना धडक एकाचा मृत्यू
Reviewed by News1 Marathi
on
November 30, 2020
Rating:

Post a Comment