डोंबिवलीतील फडके रोडवर दिवाळी पहाटला गर्दी न करण्याचे आवाहन
डोंबिवली , शंकर जाधव : कोरोना नियंत्रणात आला असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ज्या सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी गर्दी करू करू नका असे प्रशासनाकडून वारंवार उद्घोषणाद्वारे सांगण्यात आले.डोंबिवलीत दिवाळी पहाटच्या वेळी फडके रोडवर तरुणाईची प्रचंड गर्दी होत असते.
कोरोना संकट असल्याने गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करता यंदाची दिवाळी आपापल्या घरी साजरी करा असे आवाहन करण्यात आल्याचे `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी केले आहे.तर डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक एस.एन.जाधव यांनी विशेषतःफडे रोडवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.रामनगर पोलीसहि फडके रोडवर गर्दी करणाऱ्या नागरिकांवर वेळप्रसंगी कारवाई करण्याची शक्यता आहे.

Post a Comment