Header AD

किमान ठाकरे सरकारने तरी मराठ वाड्यासोबत सावत्र व्यवहार कर नये रेखा ठाकुर
परभणी, दि. ७ - काॅग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे सरकार असताना अनेकदा मराठवाड्याला मुख्यमंत्री पद देऊन ही मराठवाड्याला भवासवाड बनवण्याचे पाप सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीने केले आहे. या मुळे किमान उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारने तरी मराठवाड्यासोबत सावत्र व्यवहार न करता मराठवाडयाला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून विशेष पॅकेज देण्याची भुमिका घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकुर यांनी परभणी येथे केली. 


मराठवाडा अध्यक्ष अशोक  हिंगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत आपण आग्रही आहे. वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आरक्षणाला पांठीबा आहे. मराठवाडास्तरीय बैठकीच्या वेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी प्रदेश प्रवक्ते फारूक  अहमद, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, प्रा डॉ. सुरेश शेळके सह उपाध्यक्ष केशव मुदेवाड व मराठवाडा कार्यकारीणीसह सर्व जिल्यातील प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते.


आपली भूमिका स्पष्ट करत असताना रेखा ठाकुर पुढे म्हणाल्या की, गेल्या तीस  चाळीस वर्षात मराठवाड्याकडे राज्यांकर्त्यांचे दुर्लक्षित व भेदभाव करण्याच्या धोरणामुळे मराठवाडा हे सर्वाधीक शेतकरी आत्महत्यांचे केंद्र तर बनलेच, औद्योगिक वसाहती ओसाड पडल्यामुळे बेरोजगारीचा भस्मासुर प्रचंड वाढला आहे व निकृष्ट दर्जाच्या शिक्षणामुळे मुंबई पुण्यात सुध्दा नोकऱ्या भेटत नसल्यामुळे मराठवाड्यातील तरुणांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या सावलीत सततच्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेती व शेतकरी संपत असताना सरकारकडून दुजाभाव करत न्यायीक नुकसान भरपाई ही मिळत नाही व पिक विम्याचा लाभ शेतक-यांऐवजी विमा कंपन्यांना मिळवून देण्यात सरकार मग्न असल्याचे ही त्यांनी सांगितले. 


मराठवाड्यातील समस्यांवर राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी औरंगाबाद येथे होणारी एक दिवसीय मंत्रीमंडळाची बैठक सुध्दा अनेक वर्षापासुन घेण्यात आली नाही, वैधानीका विकास मंडळाला ऐतिहासिक बाब बनवण्याचे पाप सरकारकडून होत आहे. या सर्व भेदभावांना दूर करने, मुख्यमंत्र्यानी मराठवाड्यावर होणारा अन्याय दुर करीत मराठवाड्यातील शेतक-यांना दिवाळीपूर्वी सरसकट नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम द्यावी. अन्यथा विभागीय स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडे पर्याय राहणार नाही असा इशाराही पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला.

किमान ठाकरे सरकारने तरी मराठ वाड्यासोबत सावत्र व्यवहार कर नये रेखा ठाकुर किमान ठाकरे सरकारने तरी मराठ वाड्यासोबत सावत्र व्यवहार कर नये रेखा ठाकुर Reviewed by News1 Marathi on November 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads