Header AD

टीसीएलची टीव्ही आणि साउंडबारवर कॉम्बो ऑफरमुंबई, ११ नोव्हेंबर २०२० : टीसीएल या दुस-या क्रमांकावरील जागतिक टेलिव्हिजन ब्रँड आणि अग्रेसर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक कंपनीने यंदाच्या दिवाळीला त्यांच्या स्टोरइंडिया.टीसीएल.कॉम या ऑनलाइन स्टोअरवर दोन विशेष ऑफर दिल्या आहेत. ग्राहक कोणतेही ४के क्यूएलईडी टीव्ही खरेदी करून त्यासोबत ८,९९९ रुपये किंमतीतील साउंडबारवर २००० रुपयांची सवलत मिळवू शकतात. ४के युएचडी टीव्हीपैकी कोणताही ५० इंच टीव्ही घेतल्यास त्यांना साउंडबारवर १,००० रुपयांची सवलत मिळू शकते.


टीसीएलचे टीएस३०१५ साउंडबार हे २.१ चॅनल स्पीकर सिस्टिमसह येत असून त्यात १८० वॉटचे ऑडिओ आउटपुट मिळेल. यात वायरलेस सबवुफर असून ब्लूटूथ व्हर्जन ५.० द्वारे वायरलेस कनेक्टिव्हिटीही मिळेल. साउंडबारवर स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅझेटद्वारे यूझर्सना वायरलेस पद्धतीने संगीत लावता येईल. याद्वारे यूझर्स उत्कृष्ट ध्वनी ऐकू शकतील. तसेच त्यांच्या आवडते संगीत किंवा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.


टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले, “दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा खरेदीचा उत्सव आहे. त्यामुळे यंदा ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळावा, असे टीसीएलला वाटते. याच हेतूने आम्ही फक्त आमच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर नव्या कॉम्बो ऑफर्स घेऊन आलो आहोत. नवा क्यूएलईडी किंवा ४के युएचडी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करणा-यांना सवलतीच्या दरात साउंडबारदेखील घरी घेऊन जाता येईल.”

टीसीएलची टीव्ही आणि साउंडबारवर कॉम्बो ऑफर टीसीएलची टीव्ही आणि साउंडबारवर कॉम्बो ऑफर Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads