Header AD

तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर मंदिरात भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन

 

    डोंबिवली, शंकर जाधव : कोविड महामारीत लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती.कोरोनाचे संकट तळले नसले तरी प्रादुर्भाव कमी झाला आहे. राज्य सरकारने दैनदिन जीवन सुरळीत आणत आता धार्मिकस्थळे नियमानुसार भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने अटीशर्ती ठेऊन धार्मिक स्थळे उघडली आहेत. डोंबिवलीतील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरा भक्तांनी दर्शन घेतले तर फडके रोडवरील ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात गणेश भक्तांनी दर्शन घेतले. भक्तांसाठी मंदिरे खुली करण्याच्या निर्णयावर भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि पदाधिकाऱ्या मंदिराबाहेर आंनदोत्सव साजरा केला.कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी ससतार कॉलिनी येथील महागणपती मंदिरात दर्शन घेतले.डोंबिवली रेल्वेस्थानकापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असणारे महादेव मंदिर सव्वाशे वर्षांपूर्वीचे असून महाकाय वड-पिंपळआंबाफणसजांभुळनारळ अशा निरर्गरम्य वनराईच्या साडेआठ एकर जागेत आहे. श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ (ट्रस्ट) तर्फे नांदिवली पाडा (सागांव)मुरारबागएम.आय.डी.सी. फेज-२ मानपाडा क्रॉस रोडडोंबिवली (पूर्व) येथे महाशिवरात्री उत्सव साजरा होतो.श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ (ट्रस्ट) मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले शासनाच्या निर्देशानुसार मंदिरातील भक्तगणांना महादेवाचे दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे.डोंबिवलीत खिडकाळेश्वर मंदिरमयुरेश्वर मंदिरश्रीगणेश मंदिरशनि मंदिरमानपाडेश्वरआयप्पा मंदिरस्वामी नारायण मंदिरशिवमंदिरस्वामी समर्थ मंदिरबालाजी मंदिर आदी मंदिरातून भक्तांची नेहमी मोठ्या संख्येने गर्दी असते.सागाव येथील प्रसिद्ध सागावेश्वर मंदिरात भाजप ग्रामीण उपाध्यक्ष तथा माजी सरपंच कर्ण जाधव यांनी दर्शन घेतले. कोपर येथील स्वयंभू नागेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शन घेतले.डोंबिवली पश्चिम विभागात एक मशीद असून मुस्लिम बांधव शुक्रवारी मोठ्या संख्येने नमाज पडतात तर ख्रिश्चन धर्मियांसाठी पूर्व-पश्चिम विभागात दोन चर्च असून त्याद्वारे त्यांची धार्मिक कार्यक्रम होत असतात. बुद्ध विहारातही बुद्धवंदना करण्यासाठी समाजबांधवाची तयारी होती. सर्वच धर्मियांना गेले आठ महिने कोणतेच कार्यक्रम करता आले नसल्याने आता काही प्रमाणात कार्यक्रम करता येतील यामुळे सर्व धर्मियात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेश मंदिर प्रवेशासाठी भक्तांना मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात आला असून त्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतरमास्क बंधनकारकथर्मल स्कॅनिंगहात सॅनिटाईज आदी पंधरा सूचना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी गर्दी होईल याची काळजी मंदिर व्यवस्थापनाने घेतली असल्याची माहिती श्रीगणेश मंदिर संस्थान अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले.तर भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, यांनी राज्य सरकारने यापूर्वीच मंदिरे खुली करण्यास हरकत नव्हती. भाजपने यासाठी अनेक वेळेला आंदोलने केली होती.भाजपने जनतेसाठी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर मंदिरात भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर मंदिरात भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन Reviewed by News1 Marathi on November 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads