Header AD

युनियन बँकेत सतर्कता जागृती सप्ताह संपन्नस्वामी सुपर्णानंदजी यांच्यासोबत संवादाचे आयोजन..


मुंबई, ३ नोव्हेंबर २०२० : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या मार्गदर्शनानुसार ‘व्हिजिलंट इंडिया, प्रॉस्परस इंडिया’ (सतर्क भारत, समृद्ध भारत) या संकल्पनेवर सतर्कता जागृती सप्ताहाचे आयोजन केले गेले. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी कोलकाता येथील रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरचे माननीय सचिव स्वामी सुपर्णानंदजी यांच्यासोबत संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी युनियन बँकेच्या कर्मचा-यांसोबत मानवी स्वभावाच्या उणीवांवर संवाद साधला.


'कर्म हीच पूजा आहे' या तत्त्वानुसार मार्गक्रमण व दैवत्व वाढवणे हेच सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात प्रामाणिकपणे काम करण्याची गुरुकिल्ली आहे असे मत स्वामीजींनी व्यक्त केले. समृद्ध भारत तयार करण्यासाठी अहंकाराचे बलिदान देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवाहन कर्मचा-यांना केले. कर्मचा-यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी असे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी युनियन बँक ऑफ इंडियाची प्रशंसा केली.


या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी युनियन बँकेचे सीईओ, एमडी श्री राकिरण राय जी यांनी स्वामीजींचे स्वागत केले. ते म्हणाले, “ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याची प्रतिष्ठा बाजूला ठेवत आध्यात्मिक मूल्यांना खूप महत्त्व असते. एक व्यावसायिक संस्था या नात्याने, व्यवसायासाठी बँकरने आक्रमक असायला हवे. सध्याच्या परिस्थितीत लोभापासून दूर राहणे, ही काळाची गरज आहे.'

युनियन बँकेत सतर्कता जागृती सप्ताह संपन्न युनियन बँकेत सतर्कता जागृती सप्ताह संपन्न Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads