Header AD

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांमुळे गवळी देव सूलाई देवी पर्यटन स्थळाचा विकास होणारठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे लोकसभा क्षेत्रातील नवी मुंबई मधील एकमेव नैसर्गिक पर्यटन स्थळ गवळीदेव व सुलाईदेव डोंगरांच्या विकासासाठी खासदार राजन विचारे मागील काही वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. यासाठी वेळोवेळी वनविभाग व महानगरपालिका आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार व बैठका घेऊन चर्चा केली. परंतु निधीअभावी व वन विभागाकडे आराखडा तयार नसल्यामुळे अद्याप सदर ठिकाणचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. खासदार राजन विचारे यांनी संबंधित स्थळाचे महत्व नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले. व या स्थळांचा विकास केल्यामुळे नवीमुंबई शहराचे नावलौकिक वाढेल हे पटवून दिले.


मंगळवार दि. ०३ नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त व अधिकारी तासेच वन संरक्षक व त्यांचे अधिकारी यांच्या समवेत खासदार राजन विचारे यांनी संबंधित डोंगरांचा पाहणी दौरा केला. त्यावेळी जिल्हा प्रमुख श्री. द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई महापालिका आयुक्त मा. श्री. अभिजित बांगर, मुख्य वन संरक्षक श्री. नरेश झुरमुरे, नवी मुंबई महापालिका मुख्य अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, उप वन संरक्षक श्री. गजेंद्र हिरे, सहायक उप वन संरक्षक गिरिजा देसाई, रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री. नरेंद्र मुठे, श्री. गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे तसेच स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


नवी मुंबईतील घणसोली येथील एकमेव नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या गवळीदेव सुलाईदेवी या दोन डोंगरांच्या विकास वन विभागाकडून करण्यात येणार होता. वनविभागाकडे निधी नसल्याने नवी मुंबई महानगरपालिका या पर्यटन स्थळांसाठी वनविभागाला २०१४ साली एक कोटीचा निधी दिला होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे पर्यटन स्थळाच्या कामाला सुरुवात झाली नाही. मफतलाल समूहाच्या नोसिल कंपनीने हा डोंगर भाडेपट्ट्याने घेऊन विकसित केला असून त्या ठिकाणी पाच लाख झाडांचे संवर्धन केले होते. परंतु नोसिल कंपनी बंद पडल्यानंतर या डोंगराची वाताहत झाली. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील या डोंगराचा विकास करायचा असेल तर वनविभागाला निधी द्या, त्यानुसार वनविभाग खर्च करेल, असे वनविभागाने पालिकेला कळविले.


तसेच पाहणी दौऱ्या दरम्यान डोंगरावर स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, डोंगराच्या कडे-कपारीचे संरक्षण, माथ्यावर जाण्यासाठी पायर्‍या, विहिरी, तलावाची स्वच्छता, पर्यटन विश्रांतीकक्ष, बसण्याची व्यवस्था, पक्षी प्राण्यांची माहिती फलक, रस्त्यालगत आधुनिक पथदिवे, साफसफाई राहील यासाठी ठिकठिकाणी कचराकुंडी, ज्या ठिकाणाची वाताहत झाली आहे त्या ठिकाणी डागडुजी करणे, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सी सी टीव्ही कॅमेरा इत्यादी सुविधा लागणार आहेत. तसेच संबंधित स्थळ आकर्षक दिसण्यासाठी आणखी विविध उपाययोजना करण्यासाठी यावेळी खासदारांनी संबंधितांना सांगितले.

गवळीदेव व सुलाइदेव डोंगरावर अनेक जुनी झाडे आहेत परिसरात औषधी झाडांचा समावेश आहे त्यामुळे या परिसरात गर्द वनराई विविध पक्षी, सरडे, विविध कीटक, फुलपाखरे आहेत. तिथे पावसाळ्यात माथेरान महाबळेश्वर सारखेच वातावरण असते दोन ते तीन धबधब्यांमुळे नवी मुंबईकर गवळी देव डोंगराकडे आकर्षित होतात. तसेच गिर्यारोहक, पर्यावरण व पक्षीप्रेमी विविध प्रकारच्या माहितीसाठी या स्थळाला भेट देत असतात.


१०८ स्क्वे. किलो मीटर. च्या परिसरात असलेला गवळीदेव या डोंगराच्या विकासासाठी वनसंरक्षकांकडे प्रस्ताव मंजुरीला दिला आहे. तसेच एक ते दीड महिन्यामध्ये याचा आराखडा तयार होऊन शासनाकडून व नवी मुंबई महापालिकेकडून निधी मिळवून याचा विकास होणार आहे.


असे मुख्य संरक्षक श्री नरेश झुरमुरे यांनी सांगितले.  या विकासामध्ये पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न करता लवकरात लवकर निसर्गरम्य व प्रेक्षणीय असे हे स्थळ बनले जाईल. असे नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी सांगितले.  तसेच संबंधित आराखडा तात्काळ मंजूर करून घेण्यासाठी खासदारांनी मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन दिले. या वेळी खासदारांनी व उपस्थित मान्यवरांनी डोंगरावर स्थापन केलेल्या गणपतीचे दिवा लावून पूजन केले व पुष्प अर्पण केले.

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांमुळे गवळी देव सूलाई देवी पर्यटन स्थळाचा विकास होणार खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांमुळे गवळी देव सूलाई देवी पर्यटन स्थळाचा विकास होणार Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

प्रकाश आंबेडकरांनी घेतली एनआरसीच्या आंदोलक कामगारांची भेट

■मी आणि माझे कुंटुंब पुरतेच सरकार मर्यादीत   प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   एनआरसी कामगारांची थकीत देणी म...

Post AD

home ads