Header AD

बळीराजाच्या शक्ती ची आगळीवेगळी प्रथा, अंगणातील रोपटे उपटण्यासाठी लावलेली ताकद व्यर्थ
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  दिपावलीतील बलिप्रतिपदा दिवशी पाताळात बळी राजाची शक्ती एकवटते ,त्या मुळे सुर्योदया पूर्वी लावलेले रोप सुर्योदया नंतर किती ही शक्ती लावली तरी उपटले जात नाही ,ही पूर्वजां पासून सुरू असलेली प्रथा आज ही काही ग्रामीण भागात सुरू असून तेथील रोपटे उपटण्या साठी एक दोन नव्हे चार जणांनी शक्ती लावली तरी ते रोपटे उपटले जात नाही. पुराण काळात बळी राजा यांस भगवान विष्णू यांनी वामन अवतारात पाताळात गाडले होते त्यावेळी त्यांनी वर दिला होता की बलिप्रतिपदा दिवशी तुझी शक्ती पाताळात एकवाटणार आहे .


त्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरा नजीक खोणी गावात शांताराम पाटील हे मागील ५५ वर्षां पासून आपल्या अंगणात अंबाडी चे रोपटे सूर्योदयापूर्वी लावून ते सुर्यदया नंतर ते उपटण्या साठी प्रयत्न केला जातो . खोणी गावातील युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील  मागील २५ वर्ष या ठिकाणी हे रोपटे उपटणाऱ्यां साठी पारितोषिक घोषित करीत आहेत. यंदा मंडळाने रोपटे उपटण्यासाठी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक ठेवलं परंतु दुपारपर्यंत हे रोपटे कोणीही उपटू शकले नाही हे विशेष.या ठिकाणी श्रद्धा महत्वाची असून आज ही ग्रामीण भागात ती जोपासली जात असून त्यातून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होत असल्याची प्रतिक्रिया अरुण  पाटील यांनी व्यक्त केली आहे .
बळीराजाच्या शक्ती ची आगळीवेगळी प्रथा, अंगणातील रोपटे उपटण्यासाठी लावलेली ताकद व्यर्थ बळीराजाच्या शक्ती ची आगळीवेगळी प्रथा, अंगणातील रोपटे उपटण्यासाठी लावलेली ताकद व्यर्थ Reviewed by News1 Marathi on November 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

चालत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग करत ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रवासात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण ,कुणाल म्हात्रे  :   मध्य रेल्वेच्या आठगाव कसारा स्टेशन दरम्यान  धावत्या लोकलमध्ये दारूच्या नशेमध्ये तर्र असणाऱ्या दोन तरूण तळीरामांन...

Post AD

home ads