Header AD

भाजपाचे चिपळुणात वीज बिल होळी आंदोलन ठाकरे सरकार विरोधात घोषणा देऊन परिसर सोडला दणाणूण!
चिपळूण , प्रतिनिधी  :  ठाकरे सरकारचा धिक्कार असो,’ ‘वीज बिलं कमी करा नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘नाही कोणाच्या बापाचं, आहे आमच्या हक्काचं’, ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,’ आदी गगनभेदी घोषणा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा संपर्क कार्यालयापासून महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढून ठाकरे सरकारविरोधात देऊन चिपळुणचा परिसर दणाणून सोडला. हा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.


हा मोर्चा थेट महावितरण कार्यालयासमोरच धडकला आणि या ठिकाणी वाढीव वीज बिलांची होळी करुन ठाकरे सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यानंतर वाढीव वीज बिलांसंदर्भातत ग्राहकांच्या भावना शासनदरबारी पोहोचविण्याच्यादृष्टीने तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू यांनी आपल्या शिष्टमंडळासमेवत येथील महावितरण कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्याकडे निवेदन दिले. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला. 


कोरोना संकटकाळात वीज बिले आकारण्यात आली नव्हती. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्वसामान्यांना वीज बिले दिली गेली आहेत. परंतू, ही बिले वाढीव आल्याने सर्वसामान्यांचे  आणखीनच आर्थिकदृष्टया कंबरडे मोडले आहे. विशेषत: ही इतकी बिले आहेत की ग्राहकांना वीज बिले भरणे अवघड झाली आहेत. दरम्यान, शासनाने ही बिले भरण्यासंदर्भात सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने ग्वाही दिली होती. मात्र, ठाकरे सरकारने कोणताच दिलासा दिलेला नाही. तर उलट उर्जामंत्री ना. नितीन राऊत यांनी वीज बिलांबाबत दिलासा देता येणार नाही. आलेली वीज बिले नागरिकांना भरावी लागतील, असे स्पष्टपणे सांगितले आहे. यानुसार महावितरण कंपनी वीज बिले सक्तीने वसूल करण्याच्या तयारीत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 


जनतेची भावना लक्षात घेऊन ना. नितीन राऊत यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे तसेच महाविकास आघाडी सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात वीज बील होळी आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. यानुसार चिपळुणात आंदोलन करण्यात आले. या मोर्च्याची सुरुवात उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. निलम गोंधळी, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रणय वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा संपर्क कार्यालयापासून करण्यात आली.  


हा मोर्चा थेट महावितरण कार्यालयावर धडकला. दरम्यान, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’, ‘वीज बिल कमी करा नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’,‘ देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’ आदी घोषणा देऊन चिपळुणचा परिसर दणाणून सोडला. हा मोर्चा थेट महावितरण कार्यालयासमोरच धडकला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढीव वीज बिलांची होळी करुन ठाकरे सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यानंतर तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू यांनी आपल्या शिष्टमंडळासमवेत  महावितरण चिपळूण कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांना वीज बिलात सवलत मिळावी, याबाबत निवेदन दिले. 


यावेळी भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सौ. निलम गोंधळी, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, अजित साळवी, नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नुपूर बाचिम, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अभ चितळे, महेश दिक्षित, कामगार आघाडी संयोजक विनोद कदम, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. प्रतिज्ञा कांबळी, युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष मालप, माजी युवा मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्ष राकेश घोरपडे, संदेश भालेकर, उल्हास शिंदे, प्रवीण सुतार, प्रणय वाडकर, अशोक भडवळकर, मनोहर घाडगे, तानाजी लाखण, रत्नदीप देवळेकर, अमित ओतारी, सोमनाथ सुरवसे, संदीप सुखदरे, सुरेश कदम, मारुती होडे, विनय भागवत, मंदार कदम, मधुकर निमकर, महेश नरळकर, बंडू थरवळ, सौरभ चव्हाण, रमेश शिंदे, दिपक चव्हाण, अभयराज  विश्वकर्मा, प्रकाश तांबिटकर, सचिन कांबळे, गणेश नलावडे, सौ. रोहीणी मेंगे, समीक्षा भालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपाचे चिपळुणात वीज बिल होळी आंदोलन ठाकरे सरकार विरोधात घोषणा देऊन परिसर सोडला दणाणूण! भाजपाचे चिपळुणात वीज बिल होळी आंदोलन ठाकरे सरकार विरोधात घोषणा देऊन परिसर सोडला दणाणूण! Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads