Header AD

माझा रस्ता माझी जबाबदारी उपक्रम राबवून तरुणांनी दिला नवा संदेश

 

■भिवंडी वाडा मनोर महामार्गावरील खड्डे श्रमदानाने भरले सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुढाऱ्यांना तरुणांची चपराक...


भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी-वाडा-मनोर या संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी अत्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत.आणि याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि या महामार्गावर अपघातही खूप होत आहेत त्यामुळे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवक प्रमुख प्रमोद पवार यांनी सोशल मीडियावर आवाहन करून क्रांतिकारक स्व.वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिनी स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी "माझा रस्ता माझी जबाबदारी"हा उपक्रम राबवून हे खड्डे बुजविण्याचे केलेले आवाहन यशस्वी झाले. 


भिवंडी तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन स्वतः रस्त्यावर उतरून श्रमदानाने हे खड्डे भरून नवा आदर्श निर्माण केला। ही पुढारी नेते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला चांगलीच चपराक असल्याचे बोलले जाते.
सुरुवातीपासूनच काही ना काही कारणांमुळे हा महामार्ग वादातच राहिला आहे.अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम याचे झालेले आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्षच होत आलेले आहे.संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या जीवघेण्या खडयांमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप जीव मृत्युमुखी पडले आहेत,तर हजारो नागरिक वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन या धोकादायक महामार्गावरून रोज प्रवास करीत आहेत.या महामार्गाच्या विरोधात यापूर्वीही श्रमजीवी संघटना आणि स्थानिक तरुणांनी अनेक आंदोलने केली आहेत.


गेल्या वर्षी डॉ.नेहा शेख या तरुणीचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्यावर तरुणांनी आंदोलन करीत या रस्त्यावरील कवाड येथील टोल नाका बंद केला परंतु आजपर्यंतही परिस्थिती बदलली नसून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि येथील लोकप्रतिनिधीनी याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले असल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवा प्रमुख प्रमोद पवार यांनी आणि संपूर्ण महामार्गावरील स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी युवा क्रांतिकारक स्व. वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिवशी या महामार्गावरील आपल्या आपल्या गावाशेजारील रस्ता "माझा रस्ता माझी जबाबदारी" अश्या प्रकारचे आगळेवेगळे धोरण ठरवून श्रमदान करून या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. आज डाकीवली पुलापासून थेट महापोली गावापर्यंत मालबिडी, महापोली, अंबाडी नाका, पालखाने, वारेट, रेवदी, धोंडवडली दुगाड, इत्यादी भागातील तरुणांनी या भागात साहित्य जमा करून स्वतः कुदळ फावडे हातात घेऊन खड्डे भरले.


यावेळी श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, भूषण घोडविंदे, असगर पटेल, आर्यन ग्रुपचे कल्पेश (बाळू) जाधव, पालखने माजी सरपंच रमाकांत पाटील,रुपेश जाधव, भुषण जाधव, अकलोली भागातील श्रमजीवी कार्यकर्ते जयेश पाटील, नारायण जोशी, नवनाथ भोये, तसेच महेश ठाकरे, नईम शेख, अल्पेश जाधव, सतीश जाधव, मालबिडी चे सागर डी.जाधव, युवक काँग्रेस चे कल्पेश पाटील, राकेश जाधव, आणि अजय तनपुरे, अंकुश तनपुरे,  संजय पाटील ,रामदास पाटील इत्यादी तरुणांनी सहभाग घेतला. कुंदन पाटील (डकीवली), हर्षाली पाटील-म्हात्रे ,संजय पाटील, रोहिदास पाटील (पासूरी पाडा) विकास पाटील (घोणसाई) इत्यादी मंडळींनी आवश्यक साहित्याची मदत केली.

माझा रस्ता माझी जबाबदारी उपक्रम राबवून तरुणांनी दिला नवा संदेश माझा रस्ता माझी जबाबदारी उपक्रम राबवून तरुणांनी दिला नवा संदेश Reviewed by News1 Marathi on November 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads