कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला ९०० रुग्ण सापडले तरी महापालिका सज्ज डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण ,कुणाल म्हात्रे : दिवाळीनंतर कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ दिसून येत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता शासकीय यंत्रणांकडून वर्तवण्यात येत आहे. दिवसाला ९०० रुग्ण आढळले तरी केडीएमसी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीपूर्वी केडीएमसी क्षेत्रातील कोरोनाचे आकडे ६० च्या खाली गेले होते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते पुन्हा १५० च्या वर जाताना दिसत आहेत. मात्र महापालिकेने बनवलेल्या जम्बो फॅसिलिटीनूसार दरदिवशी ९०० पेशंट आढळले तरी आपण उपचार करण्यासाठी सज्ज असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तर केडीएमसीने आतापर्यंत २ लाख ४० हजार लोकांच्या अँटिजेन आणि कोवीड टेस्ट केल्या आहेत.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात २२ ठिकाणी कायमस्वरूपी टेस्टींग सेंटर सुरू करण्यात आले असून येत्या दोन तीन दिवसांत आणखी १५ सेंटरची वाढ केली जाणार आहे. अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह येणाऱ्यांचीही लगेच आरटीपीसीआर (कोवीड टेस्ट) केली जाणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
या व्यतिरिक्त कल्याण आणि डोंबिवली स्टेशनवर बाहेरगावाहून आलेल्या ३ हजार ५०० प्रवाशांच्या अँटिजेन टेस्टमध्ये ३७ जण पॉजीटीव्ह आढळून आले आहेत. येत्या काळात ज्या ज्या ठिकाणी टेस्टींग वाढवण्याची आवश्यकता असेल त्याठिकाणी टेस्टींग वाढवण्यात येईल अशी माहितीही पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
Post a Comment