Header AD

भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्य कारिणीची पहिली बैठक संपन्न
ठाणे,  प्रतिनिधी  :  भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. या बैठकीत आमदार व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, आमदार व ठाणे प्रभारीशिष शेलार, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले संघटन सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे, मनोहर सुगदरे आदी उपस्थित होते.कोरोना आपत्तीच्या काळात भाजपाने केलेले मदत कार्य, विविध आंदोलने आणि ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत भाजपाने केलेल्या पाठपुराव्याबद्दल जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी कार्यकारिणीला माहिती दिली. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचे कौतूक केले.

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक व सचिव संदीप लेले यांनी प्रदेश भाजपा कार्यकारिणीत झालेले विविध ठराव यांची माहिती दिली. त्यानंतर बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, बिहार प्रभारी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 


तसेच कोरोना आपत्तीच्या काळात मदत कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा गौरव करण्याचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. आमदार संजय केळकर, आमदार व प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण आणि ठाणे प्रभारी आशीष शेलार यांच्या भाषणांनी बैठकीचा समारोप करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहन अशिष शेलार यांनी केले.
भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्य कारिणीची पहिली बैठक संपन्न भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्य कारिणीची पहिली बैठक संपन्न Reviewed by News1 Marathi on November 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads