भिवंडीतील आयजीएम रुग्णालय झाले हायब्रीड रुग्णालय,एकाच वेळी कोव्हिडं नॉन कोव्हिडं रुग्णांवर उपचार सुरू
भिवंडी , प्रतिनिधी : कोव्हिडं संसर्ग वाढीच्या काळात कोव्हिडं रुग्णालय म्हणून भिवंडी शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती शासकीय उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित केले नंतर सर्वसामान्य रुग्णांवर इतर खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची नामुष्की रुग्णलाय प्रशासनावर आली असताना मुख्य वैद्यकीय अधीक्षक पदी महानगरपालिका आरोग्य विभागाची कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली असताना परिस्थिती योग्य रित्या हाताळून आर्थिक खर्चात बचत करणारे डॉ नितीन मोकाशी यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी आयजीएम रुग्णालयातील कोव्हिडं रुग्णालय सुरू असतानाच त्याच रुग्णालयातील इतर उर्वरित जागेत १०० बेड चे नॉन कोव्हिडं रुग्णालय सुरू केले असून अशा पद्धतीने नॉन कोव्हिडं व कोव्हिडं रुग्णालय एकाच रुग्णालयात सुरू करून हायब्रीड रुग्णालय सुरू केले आहे .
त्या व्यतिरिक्त नुकताच या रुग्णालयात नाॅन कोव्हीड विभागात ३० खाटांचा नविन विभाग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमा पुजनाने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. सध्या नाॅन कोव्हीड रुग्णालयात अपघात विभाग १० , प्रसूती विभाग २५ ,एसएनसीयू १५ वाॅरमर व फोटोथेरपी, पुरुष विभाग ३० ,स्त्री व बाल रोग विभाग ३० , शस्त्रक्रिया गृह १० असे बेड उपलब्ध केले असून, डायालीसीसचे ५ बेड लवकरच सुर होत असल्याने नॉन कोव्हिडं रुग्णालयात एकूण १२५ बेड सुरू झाले असल्याची माहिती डॉ नितीन मोकाशी यांनी दिली आहे .
एप्रिल मध्ये हे रुग्णालय फक्त कोव्हीड मध्ये रुपांतरीत करण्यात आले होते परंतु १५ ऑगष्ट रोजी कोव्हीड व नाॅन कोव्हीड अशी दोन रुग्णालये सुरु करण्याचा निर्णय मी महापालिकेत आरोग्य विभाग प्रमुख असतांना घेतला. ६ ऑक्टोबर रोजी मी अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय अधिक्षक पदाचा घेवुन दोन्ही रुग्णालयांची खाटांची व्यवस्था करण्यात आली व या कामात सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग घेतला त्यामुळे हे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया डॉ नितीन मोकाशी यांनी शेवटी दिली आहे .
भिवंडीतील आयजीएम रुग्णालय झाले हायब्रीड रुग्णालय,एकाच वेळी कोव्हिडं नॉन कोव्हिडं रुग्णांवर उपचार सुरू
Reviewed by News1 Marathi
on
November 20, 2020
Rating:

Post a Comment