Header AD

तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसरात भक्तांची गर्दी रोजगार चालू झाल्याने स्थानिकही सुखावले
भिवंडी , प्रतिनिधी  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंदिरे बंद करण्यात आलेले होते मात्र राज्यातील सर्व मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर खुले करण्यास परवानगी दिली आणि गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मातेचे आणि भगवान नित्यानंद बाबांचे मंदिर उघडल्याने देवी दर्शनासाठी आतुरलेल्या देवी भक्तांनी आणि भाविकांची दर्शनासाठी लगबग वाढल्याने तीर्थक्षेत्र परिसर दुमदुमून गेला आहे तर भाविक पर्यटक पुन्हा चालू झाल्याने रोजगार पुन्हा चालू झाल्याने स्थानिकही सुखावले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवीचे मंदिर आणि अकलोली येथील औषधीयुक्त नैसर्गिक गरम पाण्याचे झरे त्याचबरोबर गणेशपुरी येथील भगवान नित्यानंद बाबांचे समाधी मंदिर हे सुप्रसिद्ध आहेत.


वज्रेश्वरी माता ही समस्त आगरी,कोळी,कुणबी,वाडवळ,भंडारी आदी समाजाची कुलदेवता असल्याने वर्षाकाठी लाखो भाविक,भक्तगण दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात आणि गणेशपुरी येथील नित्यानंद महाराजांच्या समाधी दर्शनासाठी दक्षिण भारतीय भक्त मोठ्या प्रमाणावर येतात आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने पर्यटकांचीही रेलचेल असते.


त्यामुळे येथील स्थानिकांचा रोजगारही यांवरच अवलंबून आहे.परंतु कोरोनाच्या महामारीत मंदिरे बंद असल्याने देवीभक्त दर्शनासाठी आतुरले होते तर स्थानिक रोजगारापासून वंचीत झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते.लॉकडाऊन कालावधीतच वज्रेश्वरी देवीचा वासंतिक नवरात्र,शारदीय नवरात्र आणि देवीचा सर्वात मोठा चैत्र अमावस्येला होणारा पालखी सोहळ्याचा उत्सव आणि विजयादशमीला होणार पालखी सोहळा ह्या सर्व उत्सवांना भाविक आणि गणेशपुरीतील नित्यानंद महाराजांच्या गुरुपौर्णिमा आणि बाबांच्या पुण्यतिथीला होणाऱ्या उत्सवांना बाबांचे भक्त मुकले होते आणि पर्यायाने येथील दोन्हीही मंदिर प्रशासनाला लाखो रुपयांच्या उत्पन्नाचे नुकसान झाले होते.आणि या तीर्थक्षेत्री मंदिरावर अवलंबून असलेल्या शेकडो स्थानिकांचा रोजगार यामुळे गेल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.


अकलोली येथील औषधीयुक्त नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडांमध्ये आंघोळ करून वज्रेश्वरी,कालिका रेणुका या तीन देवींच्या असलेल्या भव्य मंदिरात देवी दर्शन करून भगवान नित्यानंद बाबांच्या समाधी मंदिरात पाया पडण्यासाठी वर्षाकाठी हजारोंच्या संख्येने भाविक,भक्तगण आणि पर्यटकांची येथे लगबग असते. त्यातूनच या दोन्ही मंदिरांना उत्पन्न प्राप्त होते आणि येथील शेकडो कुटुंबांचा रोजगार या मंदिरावर अवलंबून आहे.येथील मंदिराच्या पायथ्याशी असलेले हारफुल विक्रेते,हॉटेल,लॉज व्यावसायिक रिक्षावाले किरकोळ विक्रेते यांचा सर्व रोजगार या मंदिरावर चालतो आहे.त्यामुळे मंदिरे बंद असल्याने येथील शेकडो जणांचा रोजगार बंद झाला होता.


पाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यावर येथील मंदिर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून भाविकांना दर्शनाची सोय करून दिल्याने गेले आठवडाभरापासून मोठ्या संख्येने देवी भक्त भाविक पर्यटन यांची रेलचेल वाढली आहे.त्यामुळे येथील स्थानिकांचा रोजगारही पुन्हा चालू झाल्याने त्यांची विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे.कोरोना संकट थोडे कमी झाल्याने आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने गेले सात महिन्यांपासून घरी असलेले देवी भक्त भाविक पर्यटकांनी मोठ्या संख्येने येथे येत आहेत आणि त्यामुळे येथील गेस्ट हाऊस हॉटेल यांचीही बुकिंग सुरू झाली आहे.शनिवार रविवार या दिवशी तर येथे खूप मोठया प्रमाणावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती वज्रेश्वरी आणि गणेशपुरी मंदिर प्रशासनाने थर्मल स्कॅनिग,सॅनिटायझर आदी उपाययोजना करून भाविकांना माक्स सक्तीचा केला आहे आणि दोन भाविकांमध्ये योग्य ते अंतर ठेवून देवी भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे.

तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसरात भक्तांची गर्दी रोजगार चालू झाल्याने स्थानिकही सुखावले तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसरात भक्तांची गर्दी रोजगार चालू झाल्याने स्थानिकही सुखावले Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads