Header AD

लिव्हप्युअरचा स्लीप अँड वेलनेस क्षेत्रात प्रवेश


■रात्री शांत झोपेचा अनुभव देण्यासाठी नावीन्यपूर्ण सोल्युशन्सचे सादरीकरण...


मुंबई, ६ नोव्हेंबर २०२० : लिव्हप्युअर या वॉटर प्युरिफायर, एअर कंडिशनर्स आणि इतर घरातील उपकरणांची अग्रगण्य निर्माती कंपनीने स्लीप अँड वेलनेस सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. रात्री चांगल्या झोपेद्वारे अधिक दर्जेदार जीवनाचे वचन देण्यासाठी कंपनीने झोपेसंबंधी अनेक नूतनाविष्कार बाजारात आणले आहेत.

स्लीप अँड वेलनेस विभागात कंपनीने पहिले उत्पादन 'लिव्हप्युअर प्रीमियम मेमरी फोम मॅट्रेसेस' आणले आहेत. यात व्हायटल:५ इंच रिव्हर्सिबल फोम मॅट्रेस, ऑर्थो-एक्स: ६ इंच मेमरी फोम मॅट्रेस (अॅडव्हान्स्ड) बांबू फायबर फॅब्रिक कव्हरसह, रीगल:८ इंच मेमरी फोम आणि लेटेक्स मॅट्रेस. तसेच नॅचरल ६/८ इंच आयुर्वेदिक फोम मॅट्रेस उपलब्ध आहेत. आरोग्यगायी झोपेसाठी उत्कृष्ट श्रेणीतील उत्पादनांच्या अॅरेसह, लिव्हप्युअरने आपल्या उत्पादनांमध्ये वेगळेपणा दिला आहे. आरोग्य सजगता, पर्यावरणीय जागृती, नावीन्य आणि बदलासह अनेक यूएसपींच्या आधारावर एक अग्रेसर स्थान प्राप्त केले आहे.


लिव्हप्युअरचे सीईओ श्री प्रीतेश तलवार म्हणाले, 'विविध घरगुती उत्पादनांद्वारे ग्राहकांना निरोगी ठेवण्याचा आमचा दृष्टीकोन असून स्लीप अँड वेलनेसमधील लिव्हप्युअरचा प्रवेश या जगाशी सुसंगत आहे. घरगुती उपकरण आणि आरओमध्ये पूर्वीपासूनच नावीन्यपूर्ण टप्पे गाठत, घराच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एंड टू एंड ब्रँड म्हणून या क्षेत्रात प्रवेश करणे हे आमच्यासाठी स्वाभाविक होते. बजेटसाठी अनुकूल किंमतीत ग्राहकांना सर्वोत्तम व उत्कृष्ट दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देण्यावर ब्रँडचा विश्वास आहे. ग्राहककेंद्रीत धोरणावर भर देत लिव्हप्युअरने सीओडी ऑप्शन, १०० नाइट्स रिस्क-फ्री ट्रायल, प्रत्येक उत्पादनाची १ वर्षाची वॉरंटी आणि विनामूल्य शिपिंगची सुविधा दिली आहे.

लिव्हप्युअरचा स्लीप अँड वेलनेस क्षेत्रात प्रवेश लिव्हप्युअरचा स्लीप अँड वेलनेस क्षेत्रात प्रवेश Reviewed by News1 Marathi on November 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads