Header AD

ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मुर्तीकार विनायक कुंभार यांचे निधन




भिवंडी ,  प्रतिनिधी   :  ठाणे जिल्हा कुंभार समाजाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध मुर्तीकार विनायक कुंभार ( ६५ ) यांचे आज सकाळी अल्पशा  आजाराने राहत्या घरी निधन झाले.त्यामुळे भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे.भिवंडी शहरातील कुंभार आळी येथे राहणारे विनायक कुंभार हे गेल्या ४५ वर्षा पासून भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध मुर्तीकार म्हणून परिचित होते.गणेशोत्सव, नवरात्रौ उत्सव व दिवाळी  सणा प्रसंगी आकर्षक मुर्ती तयार करीत.त्यामुळे भिवंडी सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात भावीक वर्ग व सार्वजनिक मंडळ त्यांच्या कडून देवाच्या मुर्ती घेत, सेवाभावी कार्य म्हणून ते काम करत होते. 


त्यांच्या पत्नी सह सर्व कुटुंब मुर्तीकार व्यवसाय करीत असुन विशाल कला मंदिरात त्यांनी अनेकांना विनामूल्य मुर्ती तयार करून रंगकाम करण्याचे शिक्षण युवकांना दिले आहे.ठाणे पोलीस आयुक्तांलय सह अनेक सामाजिक संस्थेच्यावतीने त्यांचा उत्कृष्ट मुर्तीकार म्हणून गौरव झाला आहे.तसेच ते कुंभार समाजाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी असताना उपचार सुरू असतान त्यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन असा मोठा परिवार आहे.सायंकाळी त्यांच्या वर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मान्यवर नागरीक उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मुर्तीकार विनायक कुंभार यांचे निधन  ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मुर्तीकार विनायक कुंभार यांचे निधन Reviewed by News1 Marathi on November 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads