Header AD

कँडिअरचे दिवाळी कॅम्पेन ‘इस दिवाली फायदा फिक्स है’ हे नवे कँपेन सुरू
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२० : कँडिअर या मुंबईतील अग्रेसर ऑनलाइन ज्वेलरी स्टोअरने यावर्षीचा दिवाळी सण आणखी खास करण्यासाठी ‘इस दिवाली फायदा फिक्स है’ हे नवे कँपेन सुरू केले आहे. डबल गोल्ड रेट प्रोटेक्शन प्लॅन (डीजीआरपी) साठी ही ऑफर देण्यात आली आहे. ही अशा प्रकारची पहिलीच योजना असून, डीजीआरपी प्लॅनमध्ये ग्राहकांना दागिन्यांची खरेदी अॅडव्हान्समध्ये करता येईल. पण त्यासोबतच, अस्थिर असलेले सोन्याचे दरही गोठवता येतील. नंतर सोन्याचे दर कमी झाले तरी त्यांना पूर्वीच्याच दराने मूल्य मिळेल. या योजनेतील ऑर्डर मूल्यावर ग्राहकांना १०% ऑफ मिळेल आणि ०% व्याजदर, शून्य प्रक्रिया शुल्क, हवी ती पेमेंट पद्धती इत्यादी अनेक फायदे मिळतील.


सोन्याच्या दागिन्यांसाठी, ही मुदत ६ महिने तर डायमंड दागिन्यांसाठी ही मुदत १२ महिन्यांसाठी असेल. अधिक मूल्य असलेल्या डायमंड खरेदीसाठी अधिक चिकित्सक ग्राहकांना सहज पेमेंटसाठी कालावधी दीर्घ ठेवण्यात आला आहे. मोठा काळ दिल्याने ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी योग्य निर्णय घेण्यास अधिक वेळ मिळेल.


कँडिअरचे संस्थापक आणि सीईओ रुपेश जैन म्हणाले, “दागिने खरेदी ही भारतीय परंपरेच्या धाग्यात विणलेली आहे. त्यामुळेच आम्ही हा अनुभव अधिक सुलभ आणि आनंददायी करु इच्छितो. सोन्याच्या दरांचे संरक्षण ही बहुतांश सोन्याच्या वीटा असलेल्या स्टोअरद्वारे वापरली जाणारी एक जुनी संकल्पना आहे. जिथे ग्राहक सोने बुक करू शकतात आणि नंतर खरेदी करू शकतात. यातच आणखी एक पाऊल पुढे टाकत, कँडिअरने डीजीआरपी योजना आणली असून, याद्वारे किंमतीत घट झाल्यास ग्राहकांना दरात सुधारणा करण्याची सुविधा दिली जाते. #फायदाफिक्सहै कँपेनचे उद्दिष्टच आहे की, दर अस्थिर असूनही ग्राहकांना दागिने खरेदी सहज-सोपी व्हावी. कारण यामुळे ग्राहकांसाठी फायद्याची स्थिती होईल व ही प्रक्रिया तणावमुक्त होईल.”


कँडिअरचे दिवाळी कॅम्पेन ‘इस दिवाली फायदा फिक्स है’ हे नवे कँपेन सुरू कँडिअरचे दिवाळी कॅम्पेन ‘इस दिवाली फायदा फिक्स है’ हे नवे कँपेन सुरू Reviewed by News1 Marathi on November 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

रेल्वे मार्गाच्या भूसंपादना साठी लवकरच प्राधिकृत अधिकारी

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ...

Post AD

home ads