Header AD

भाजपा महिला मोर्चातर्फे भिवंडीत शेकडो नागरिकांची मोफत तपासणी


◆भाजपाच्या भिवंडी शहर महिला मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात रुग्णांना औषधे देताना खासदार कपिल पाटील व आमदार महेश चौगुले....


भिवंडी,  प्रतिनिधी  :  भाजपाच्या भिवंडी शहर महिला मोर्चाच्या वतीने आज आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.शहरातील श्रीरंग नगरमध्ये मोफत आरोग्य शिबिर भरविण्यात आले होते. या शिबिरात संपूर्ण आरोग्य तपासणीबरोबरच मोफत औषधे व वैद्यकिय सल्ला देण्यात आला. या वेळी आमदार महेश चौगुले, नगरसेवक सुमित पाटील, वासु नाडार, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा ममता परमाणी आदी उपस्थित होते.


वाढत्या लोकसंख्येमुळे भिवंडी शहरातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. मात्र, पुरेशा सुविधा पुरविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, याकड् खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर जाता सुविधा पुरविण्याची मागणी केली.
भाजपा महिला मोर्चातर्फे भिवंडीत शेकडो नागरिकांची मोफत तपासणी भाजपा महिला मोर्चातर्फे भिवंडीत शेकडो नागरिकांची मोफत तपासणी Reviewed by News1 Marathi on November 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads