Header AD

भिवंडी पंचायत समितीमध्ये आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रशांसाठी प्रशासन अधिकाऱ्यांसोबत आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांची बैठक संपन्न !

 

■भिवंडीत वन विभागाच्या १५० एकर जमिनीवर मांगुर माश्यांचे १२६ पेक्षा जास्त अनधिकृत तलाव सरकारची बंदी असलेल्या  मांगुर माश्यांचे भिवंडीत खुलेआम होतेय उत्पादन मांगुर माश्यांमुळे नागरिकांना कॅन्सरचा धोका...भिवंडी , प्रतिनिधी  :  आदिवासींचे विविध प्रलंबीत प्रश्न शासकीय पातळीवर मार्गी लावण्यासाठी राज्य आढावा समितीचे अध्यक्ष तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित  (राज्यमंत्री दर्जा ) यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी सायंकाळी एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या विशेष बैठकीत आदिवासींचे विविध प्रलंबीत प्रश्न व मानवी जातीला घातक असलेले व शासनाची बंदी असलेल्या   मांगरूळ माशांची होणारी पैदास बंद करण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे.पर्यावरणाला अत्यंत घातक असलेल्या  मांगूर जातीचे माशाची प्रजाती नष्ट करण्याचे आदेश केंद्र सरकारने १९ डिसेंबर १९९७ रोजी दिले गेले आहेत.


राज्य सरकारनेदेखील आयुक्त,मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यातील उपआयुक्त मत्स्यव्यवसाय यांना १६ जून २०११ रोजी  मांगुर माश्यांच्या प्रजाती नष्ट करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.परंतू या विरोधात २०१८ मध्ये हरित लावादात याचिका दाखल करण्यात आली होती.त्याचाही निकाल सरकारच्या बाजूने लागलाआहे.मांगुर हा माणसाच्या जीवनाला तसेच पर्यावरणाला घातक असणारा मासा आहे. त्याची मत्स्यबीज केंद्रे आणि त्याचा तलावातील मत्स्य साठा संपूर्णपणे नष्ट करण्याबाबतचा आदेश असतानाही भिवंडीमध्ये मुंबई - नाशिक महामार्गाच्या बाजूला नदी किनारी व वन विभागाच्या १५० एकर  जमिनीवर १२६ पेक्षा जास्त तलाव आढळले आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी वन विभागाच्या जागेतील अनधिकृत तलावांवर तात्काळ कारवाई करून सदर मत्स्यसाठा ८ दिवसांत नष्ट करून याबाबतच्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दोन दिवसात खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.त्याचप्रमाणे अतिक्रमण झालेली वनजमीन वनखात्याच्या ताब्यात घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिले आहेत. 


भिवंडी तालुक्यात भूमिहिनांना वाटप करण्यात आलेल्या नवीन शर्तीच्या जमिनी आणि भिवंडी उपविभाग क्षेत्रातील वनहक्क कायद्याची अंमलबजावणीबाबत राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांनी आढावा घेतला.भिवंडीतील राहुर, कुंभारशिव, शिरगाव या परिसरात भूमिहीनांना तसेच वन पट्टे धारकांना दिलेल्या जमिनीवर आदिवासींच्या दारिद्र्य व अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी अनधिकृतपणे तलाव खोदून त्यात बंदी असलेल्या मांगुर माश्यांचे पालन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.या ठिकाणी वन विभागाच्या १५० एकर जमिनीवर १२६ पेक्षा जास्त तलाव आढळून आले.सदर मांगुर माश्यांच्या उत्पादनामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाहणी दौऱ्याच्यावेळी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर ,तहसीलदार आदीक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, प्रकल्प अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस निरीक्षक पडघा, तसेच महसूल, वन व आदिवासी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष घटनास्थळी जाऊन स्थळ पाहणी केली.त्यावेळी या परिसरात मांगुर माशाचा मोठा साठा असलेले तलाव आढळून आले.


तसेच या परिसरात काही बेकायदेशीर बांधकामे देखील महसूल आणि वन विभागाच्या जागेवर आढळून आली आहेत.या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांत अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी सांगितले की आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सकारात्मक असून कायदेशीर तपासण्या करून आदिवासींचे प्रश्न तात्काळ सोडवले जातील तसेच भिवंडीत सरकारी बंदी असलेले मांगुर माश्यांची होणारी पैदास तात्काळ बंद करण्यात येईल.यावेळी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर,तहसीलदार आदिक पाटील, गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, पडघा वन परक्षेत्र अधिकारी संजय धारावणे,सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, उपअभियंता दत्तू गीते,सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीम.गलांडे यांच्यासह इतर अधिकारी तसेच श्रमजीवी संघटनेचे तालुध्यक्ष सुनिल लोणे,सागर देसक,सरचिटणीस बाळाराम भोईर ,मोतीराम नामकुडा ,संगीता भोमटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिवंडी पंचायत समितीमध्ये आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रशांसाठी प्रशासन अधिकाऱ्यांसोबत आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांची बैठक संपन्न ! भिवंडी पंचायत समितीमध्ये आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रशांसाठी प्रशासन अधिकाऱ्यांसोबत आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांची बैठक संपन्न ! Reviewed by News1 Marathi on November 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

चक्रीवादळाचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही अनेक पक्ष्यांचा मृत्यू तर काहींना वाचवण्यात यश

कल्याण, कुणाल  म्हात्रे  :   तौक्ते चक्रीवादळामूळे केवळ लोकांच्याच मालमत्तेचे नुकसान झाले नसून अनेक मुक्या प्राणी आणि पक्ष्यांनाही त्याचा फट...

Post AD

home ads